महाकरिअर पोर्टल ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:33 AM2021-09-24T04:33:57+5:302021-09-24T04:33:57+5:30

या कार्यशाळेत ग्राम उमरी येथील सम्राट अशोक विद्यालय व ग्राम भिवखिडकी येथील स्व. कवळू पाटील लांजेवार हायस्कूल मधील वर्ग ...

In the excitement of MahaCareer Portal Online Workshop | महाकरिअर पोर्टल ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात

महाकरिअर पोर्टल ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात

Next

या कार्यशाळेत ग्राम उमरी येथील सम्राट अशोक विद्यालय व ग्राम भिवखिडकी येथील स्व. कवळू पाटील लांजेवार हायस्कूल मधील वर्ग ८ ते १० पर्यंतचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. डायटचे प्राचार्य राजेश रुद्रकार यांच्या प्रेरणेतून आयोजित या ऑनलाईन कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक घनश्याम गहाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी आर.एल. मांढरे व सूर्यभान टेंभुर्णे उपस्थित होते. ऑनलाईन कार्यशाळेला अधिव्याख्याता व व्हिजीपीजी विभाग प्रमुख योगेश्वरी नाडे व जिल्हा समुपदेशक मिलिंद रंगारी यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यशाळेत करिअर मार्गदर्शन, महाकरिअर पोर्टल माहिती, कोविड -१९ काळातील व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी प्रश्नोत्तराच्या तासानंतर कार्यशाळेची सांगता झाली. प्रास्ताविक गट समन्वयक व व्हिजीपीजी तालुका विभाग प्रमुख सत्यवान शहारे यांनी मांडले. संचालन करून आभार विषय साधनव्यक्ती उर्मिला पडोळे यांनी मानले. कार्यशाळेला सर्व साधनव्यक्ती, दोन्ही शाळांतील शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: In the excitement of MahaCareer Portal Online Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.