‘एक दिवस- एक कार्यक्रम’ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:21+5:30
कार्यक्रमाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी बी.जे.राऊत, माविमच्या लोकसंचालीत साधन केंद्राच्या तालुका व्यवस्थापक मोनिता चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात किटक व जलजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी गोंदिया शहरातील सर्व बचतगटांच्या महिलांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी सर्व बचतगट प्रवर्तकाची कार्यशाळा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्तवतीने माविम कार्यालयात डेंग्यू प्रतिरोध महिन्याचे निमित्त साधून ‘एक दिवस-एक कार्यक्र म’ असा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी बी.जे.राऊत, माविमच्या लोकसंचालीत साधन केंद्राच्या तालुका व्यवस्थापक मोनिता चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात किटक व जलजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी गोंदिया शहरातील सर्व बचतगटांच्या महिलांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी सर्व बचतगट प्रवर्तकाची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत डेंग्यू, हिवताप व चिकनगुनिया या आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा पर्यवेक्षक कुमरे यांनी किटकजन्य आजारांबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आठवड्यातील १ दिवस कोरडा दिवस पाळणे. म्हणजे घरातील पाण्याची सर्व भांडी घासून पुसून कोरडे करून ठेवणे, ड्रम,कुलर, पाण्याच्या टाक्या, रांजण, फुलदाण्यातील साचलेले पाणी रिकामे करणे, टायरमधील पाणी, नारळाच्या करवंट्यात तसेच टाकाऊ वस्तूमध्ये पाणी साचू देऊ नये, झोपताना नियमित मच्छरदाणीचा वापर करावा, शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बांधणे, घराबाहेर डबक्यांतसाचलेल्या पाण्यात गाडीचे जळालेले इंजिन ऑइल टाकावे, ताप,अंगदुखी, डोकेदुखी व उलटी अशी लक्षणे दिसून आल्यास जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी किंवा सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले. कार्यक्रमाला कुंजलता भुरकुंडे, जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचारी आशिष बेले, पंकज गजभिये, राठोड, बैसवारे, शेंडे, पाटणकर तसेच सर्वच बचत गट प्रवर्तक उपस्थित होते.