सिंचन विहिरीचे ८५ लाख रुपये थकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:35+5:302021-08-29T04:28:35+5:30

सालेकसा : १३ हजार सिंचन विहीर या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ७५ शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले आहे. मात्र, सन ...

Exhausted Rs. 85 lakhs for irrigation wells | सिंचन विहिरीचे ८५ लाख रुपये थकून

सिंचन विहिरीचे ८५ लाख रुपये थकून

Next

सालेकसा : १३ हजार सिंचन विहीर या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ७५ शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले आहे. मात्र, सन २०१९ पासून त्यांचे ८५ लाख रुपये थकले असून आता लाभार्थी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत.

सुमारे ८५ लाख रुपये अडकल्याने ज्या लाभार्थ्यांनी खासगी सावकाराकडून व्याजावर पैसे आणून कसेबसे सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले त्यांना मात्र आज मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी दौऱ्यावर आले की मोठमोठी आश्वासन देऊन निघून जातात. मात्र, त्यानंतर काहीच होत नसल्याने सामान्य माणसांचा कैवारी कोण? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे १२ कोटी रुपये वर्धा जिल्ह्यात आले होते. परंतु गोंदिया जिल्ह्याला पैसे देण्यात आले नसून या जिल्ह्यात जवळपास ९० टक्के शेतकरी हे शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. शासनाने सिंचन विहिरींची थकीत रक्कम शेतकऱ्यांना त्वरित द्यावी अशी मागणी राजू यटरे, श्यामलाल बैठवार, प्रणिता बहेकार, यशोदाबाई यांच्यासह इतर लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे.

Web Title: Exhausted Rs. 85 lakhs for irrigation wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.