बहुगुणी मोहफुलाच्या झाडाचे अस्तित्व धोक्यात

By admin | Published: May 20, 2017 02:02 AM2017-05-20T02:02:40+5:302017-05-20T02:02:40+5:30

ज्याचे प्रत्येक अंग विविध औषधी गुणांनी भरपूर असून फुलांसह फळ, फांद्या, जडमूळ सर्व भाग बहुपयोगी असतो,

The existence of multicolored eagle tree in danger | बहुगुणी मोहफुलाच्या झाडाचे अस्तित्व धोक्यात

बहुगुणी मोहफुलाच्या झाडाचे अस्तित्व धोक्यात

Next

पावसाळ्यापूर्वी होते कत्तल : जळाऊ लाकडासाठी प्रथम पसंती, टोरीपासूनही मिळते उत्पन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : ज्याचे प्रत्येक अंग विविध औषधी गुणांनी भरपूर असून फुलांसह फळ, फांद्या, जडमूळ सर्व भाग बहुपयोगी असतो, त्या मोहफुलांची झाडांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहेत.
जळाऊ लाकडांच्या श्रेणीतही मोहाच्या झाडाला प्रथम पसंती असून लोक अन्न शिजविण्यासाठी चुलीत जाळण्यासाठी मोहाची लाकडे वापरतात. मोहाच्या लाकडाचा विस्तव जास्त प्रखर असून लवकर न विझणारा, जेवणाचा स्वाद वाढवणारा असतो. कमी लाकडे जास्त दिवस पुरतात म्हणून लोक जळाऊ कामासाठी मोहाच्या लाकडांची जास्त मागणी करतात. अशात पावसाळ्यापूर्वी मोहाच्या झाडांची मोठी कत्तल करून जळाऊ लाकडे तयार करतात.
मोहाच्या विविध गुणांकडे दुर्लक्ष करीत निदर्यतेने झाडांची कत्तल करुन जळाऊ लाकडे तयार करुन भस्मसात करतात. एवढेच नाही तर काही लोक मोहाच्या लाकडाची खरेदी-विक्रीसुद्धा करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात मोहाचे झाड नामशेष राहील का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
दोन हजार रुपये किमतीची लाकडे देणाऱ्या मोहाच्या झाडापासून जवळपास चार हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमती मोहाफुले दरवर्षी मिळत असतात. तेवढ्यात किमतीचे मोहाची मुळे, ज्याला टोर म्हणतात ती प्राप्त होतात. मोहाच्या झाडाची पानेसुद्धा बहुगुणी व बहुउपयोगी असून त्यापासून उत्पन्न प्राप्त करता येऊ शकते. ही पाने द्रोण व पत्रावळी बनविण्यासाठी सर्वोत्तम असून त्या पत्रावळीत जेवण करणे स्वादीष्ट वाटते. ग्रामीण भागात कोणत्याही धार्मिक कार्यात मोहाच्या झाडाच्या पानांना मोठे महत्व आहे. ही झाडे उंच व दमदार असतात. तसेच जंगल परिसरात सुद्धा विविध प्रकारची लहान मोठी मोहाची झाडे असतात.
जानेवारी महिन्यात पानझडी सुरू होतात झाडाच्या पानाची गळती होते आणि मोहफुले लागण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. फेब्रुवारी-मार्चमध्ये मोहफुले लागतात व ते खाली पडणे सुरू होते. जवळपास दोन महिने झाडापासून मोहफुल मिळतात. ती वेचून गोळा केली जातात व संकलित करून वाळविली जातात.
रसाळ मोहाफुलांपासून तर सुकलेले मोहफुले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी उपयोगात आणले जातात. रसाळ दाक्षे आणि रसाळ मोहफुले तसेच सुकलेले द्राक्ष (मनुका)आणि सुकलेले मोहफुले (मोहा) यांच्यात तुलना केलीतर मोहफुले द्राक्षांपेक्षा पाच पटीने जास्त गुणकारी व लाभ कारक असतात.
मोहफुले पडल्यानंतर एप्रिल मे महिन्यात झाडाला टोर (फळ) लागणे सुरु होते. तसेच झाडाला नवीन पानेसुद्धा लागतत. व्यवसायीक दृष्टीकोन बाळगून मोहाच्या झाडाची पाने तोडून पत्रावळी, द्रोण तयार केली तर त्या द्रोण पत्रावळीला योग्य किंमत मिळू शकते. प्लास्टीक कटोऱ्या आणि ताटात जेवण करून लोक वैतागले आहेत. प्लास्टिकचे ताट सध्या वातावरणासाठी मोठे नुकसानकारक ठरत आहेत. अशात मोहाची पाने पत्रावळीसाठी सर्वोत्तम व पर्यावरकपूरक ठरू शकतात.
मे व जून महिन्यात टोरी पिकण्याला सुरूवात होते. पिकलेले टोर खाणे स्वादीष्ट व आरोग्यवर्धक असते. टोर पिकून खाली पडल्यावर किंवा झाडावरुन तोडून आणूण लोक त्या टोरीचे बिया बाहेर काढतात. त्याचे टरफल काढून टोरीची दाळ संकलित करतात. त्या टोरीच्या दाळीला मोठी मागणी असते. टोरीचे तेल विविध औषधीय गुणांनी भरपूर असून त्याचे बहुउपयोगी महत्व असते. म्हणून टोरीचे तेल मोठ्या किमतीने विक्री होते व उत्पन्न देणारे ठरते. हा सगळा विचार केला तर ज्यांच्याकडे मोहाचे झाड आहे तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे की नाही, ही कल्पना करू शकतो.
ग्रामीण भागामध्ये दरवर्षी पाच ते सात टक्के मोहाच्या झाडाची कत्तल फक्त जळाऊ लाकडासाठी केली जात आहे. जर अशाच क्रम सुरू राहीला तर एक दिवस मोहाचे झाड नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.

दोन हजाराचे झाड
देते १० हजाराचे उत्पन्न
मोहाच्या झाडांच्या विविध गुणाबद्दल व उपयोगाबद्दल विचार केला तर मोहाचे झाडे हे नसुते झाड नसून जीवनदायी वृक्ष असून प्रकृतीने दिलेले मानवासाठी दिलेले श्रेष्ठ वरदान आहे. ज्या व्यक्तीकडे मोहाची झाडे आहेत तो व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत व्यक्ती आहे. समजा एखाद्या व्यक्तीकडे शेतात किंवा त्याच्या अधिकार क्षेत्रात एखादा मोहाचा झाड असेल आणि त्या झाडाच्या लाकडाची किमत दोन हजार रुपये असेल तर तो झाड दरवर्षी आठ ते दहा हजारांचे उत्पन्न मिळवून देऊ शकतो. परंतु त्याची कत्तल केल्यास एकदाच दोन हजार रुपये मिळतील. हे गणित त्या वृक्ष मालकला अनेकवेळा समजत नाही किंवा त्याला कोणी समजावण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे त्या व्यक्तिचा कायमचा लाभ मिळण्याचा मार्ग बंद होतो.

आॅक्सिजन देणारे व पोपटाचे वास्तव्य
मोहाचे झाड कधीच नष्ट होत नाही. मोहाचे झाड मनुष्याला भरपूर आॅक्सिजन देणारे अूसन वातावणाला शुद्ध करण्यात मोलाची भूमिका पार पाडतो. मोहाच्या झाडामध्ये पोकळ ढोले असतात. त्यात पोपटाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून इतर पक्षीसुद्धा मोहाच्या झाडाला आपला आश्रय स्थळ बनवितात. असे शेकडो गुण व मानवासह पशुपक्ष्यांसाठी जीवनरक्षक ठरणारा मोहाचा झाड, त्याच्यावर केव्हा कुऱ्हाड चालेल आणि केव्हा तो अग्निदेवाच्या आहारी जाईल, हे ही सांगता येत नाही.
गरिबांचा मनुका, अर्थाजनाची संधी
पावसाळ्यात गरिबांचा मनुका म्हणून मोहफुले सर्वश्रेष्ठ

Web Title: The existence of multicolored eagle tree in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.