सरकारची अकार्यक्षमता उघड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:06 PM2017-09-18T22:06:50+5:302017-09-18T22:07:03+5:30

जनतेत आज सरकार प्रती नाराजी असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, कृषी उत्पादनाच्या समर्थन मूल्यांत कपात यासारखे अनेक मुद्दे केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता उघड करत आहेत.

Explain the inefficiency of the government | सरकारची अकार्यक्षमता उघड करा

सरकारची अकार्यक्षमता उघड करा

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुका कॉंग्रेस कमिटीचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जनतेत आज सरकार प्रती नाराजी असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, कृषी उत्पादनाच्या समर्थन मूल्यांत कपात यासारखे अनेक मुद्दे केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता उघड करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आता भाजप सरकारचा खरा चेहरा उघड करावा. सरकारची अकार्यक्षमता जनतेपुढे उघडकीस आणून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकजूट होऊन कामाला लागावे, असे आवाहन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रताप लॉन येथे आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले सन २००४ मध्ये कॉंग्रेस जेथे १०-१२ ग्रामपंचायतवर मर्यादित होता. तेथेचे आज कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ताकत मिळाली आहे. सुमारे ६५ ग्रामपंचायतवर कॉंग्रेसचा झेडा फडकला आहे.
जिल्हा परिषदेतही कॉंग्रेस सत्ता असून पंचायत समितीवर मागील १५ वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता आहे. कार्यकर्त्यांची सततची मेहनत व मार्गदर्शनाचे हे फलीत आहे. आज आम्ही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या स्थितीत शेतकºयांच्या बाजूने गोंदियापासून मुंबई पर्यंत आवाज उठविला. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सर्वप्रथम आम्ही परिस्थितीशी अवगत करवून दिले. आता आमच्या पाठोपाठ अन्य पक्ष या विषयावर आपली पोळी भाजत आहे. मात्र जिल्ह्यातील जनता व शेतकरी सर्वांनाच कॉंग्रेसच्या धोरणांची जाणीव आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आता पूर्ण जोर लावून ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाच्या नावावर पक्षाचा प्रचार करावा असे आमदार अग्रवाल म्हणाले.
पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, कॉंग्रेसने महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन पुरूषांच्या बरोबरीचा दर्जा दिला. तेथेच भाजप सरकारने मात्र महिलांना दैनंदिन उपयोगात येणाºया वस्तूंचे भाव वाढवून त्यांच्या विश्वासावर आघात केला आहे. त्याचे उत्तर महिला ग्रामपंचायत निवडणुकीत देणार असल्याचे मत व्यक्त केले. संचालन तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, अशोक बाकलीवाल यांनी केले. आभार महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले. मेळाव्याला जिल्हा परिषद सभापती विमल नागपूरे, बाजार समिती उपसभापती धनलाल ठाकरे, अरूण दुबे, कुर्मराज चव्हाण, भास्कर रहांगडाले, रमेश अंबुले, सीमा मडावी, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, शेखर पटले, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, चमन बिसेन, प्रमिला करचाल, निता पटले, विनीता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनीत मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, खेमन बिरनवार, सावलराम महारवाडे, रमेश लिल्हारे, रूद्रसेन खांडेकर, अर्जून नागपूरे, जगदीश अग्रवाल, देवेंद्र मानकर, जगतराय बिसेन, बंडू शेंडे, संतोष घरसेले, वाय.पी. रहांगडाले, महेंद्र बिसेन, सरोज मस्करे, जे.सी.तूरकर, ब्रिजलाल पटले, नामदेव सहारे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Web Title: Explain the inefficiency of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.