रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त अस्थायी कोचची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 12:20 AM2017-06-18T00:20:01+5:302017-06-18T00:20:01+5:30

रेल्वे प्रशासनाद्वारे गाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेवून काही एक्सप्रेस गाड्यांमध्ये

Extra Temporary Coach Facility in Railway Trains | रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त अस्थायी कोचची सुविधा

रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त अस्थायी कोचची सुविधा

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेल्वे प्रशासनाद्वारे गाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेवून काही एक्सप्रेस गाड्यांमध्ये अतिरिक्त कोच अस्थायी स्वरूपात लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात गाडी (१२८३४/१२८३३) हावडा-अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसमध्ये कोच (०१ एसी-३) हावडावरून १४ जून ते १६ जूनपर्यंत व अहमदाबादवरून १६ ते १८ जूनपर्यंत, गाडी (१२९०५/१२९०६) पोरबंदर-हावडा-पोरबंदर एक्सप्रेसमध्ये कोच (०१ स्लीपर) पोरबंदरवरून १४ ते १५ जूनपर्यंत व हावडावरून १६ ते १७ जूनपर्यंत तसेच गाडी (२२९०९/२२९१०) वलसाद-पुरी-वलसाद एक्सप्रेसमध्ये कोच (०१ स्लीपर) वलसाडवरून १५ जूनपासून व पुरीवरून १८ जूनपासून लावण्यात येणार आहे.
याशिवाय रेल्वेद्वारे एक्सप्रेस गाड्यांमध्ये विविध श्रेणीत होणारी गर्दी लक्षात घेवून प्रवाशांसाठी वेळोवेळी अतिरिक्त कोचची व्यवस्था व कोच प्रकारांमध्ये संशोधन केले जाते. त्यानुसार गाडी (१८४०५/१८४०६) पूरी-अहमदाबाद-पूरी एक्सप्रेसमध्ये कोच प्रकार संशोधित करण्यात आले आहे. यात सामान्य प्रकारच्या सहा कोच, स्लीपर नऊ कोच, एसी-२ एक कोच, एसी-३ तीन कोच, पेंट्रीकार एक, दोन जनरेटरसह २२ कोचेसचे संशोधन करण्यात आले आहे. यात पूरीवरून १४ जूनला व अहमदाबादवरून १६ जूनला कोच संशोधन करण्यात आले.

 

Web Title: Extra Temporary Coach Facility in Railway Trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.