रुक्मणी आडवानी यांचे मरणोपरांत नेत्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:10 AM2018-09-23T00:10:50+5:302018-09-23T00:14:50+5:30
हळूहळू शहरवासीयांमध्ये नेत्रदान आणि अवयवदानाप्रती जागृकता निर्माण होत आहे. नागरिक स्वत:हून नेत्रदान व अवयवदान करण्यासाठी पुढे येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हळूहळू शहरवासीयांमध्ये नेत्रदान आणि अवयवदानाप्रती जागृकता निर्माण होत आहे. नागरिक स्वत:हून नेत्रदान व अवयवदान करण्यासाठी पुढे येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. शहरातील श्रीनगर रहिवासी रुक्मणी आडवानी यांचे गुरूवारी (दि.२०) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी रुक्मणी याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. लगेच याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्ररोग तज्ञांना देण्यात आली. त्यांनी लगेच नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे दोन जणांना दृष्टी मिळणार आहे. यासाठी सिंधी पंचायतच्या सदस्यांनी पुढकार घेतला. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वी सिंधी समाजबांधवातर्फे आयोजित एका कार्यक्रमात दीडशे नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता.
त्याच अंतर्गत रुक्मणी आडवानी यांचे नेत्रदान करण्यात आले. दरम्यान हळूहळू शहर व ग्रामीण भागातील नागरिक नेत्रदानाप्रती डोळस होत असल्याचे चित्र आहे.