मुखवट्याआड दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 09:51 PM2018-05-15T21:51:35+5:302018-05-15T21:51:35+5:30

भर उन्हाळ्यात भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्ये होणार आहे.

The facade of the mausoleum and the glory of the giants | मुखवट्याआड दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मुखवट्याआड दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Next
ठळक मुद्देदिल्ली ते गल्लीचे निवडणुकीकडे लक्ष : लोकसभा पोटनिवडणूक, प्रचाराचा ज्वर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भर उन्हाळ्यात भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्ये होणार आहे. ही निवडणूक जेवढी उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. त्यापेक्षा ती अधिक या उमेदवारांच्या मुखवट्या आड असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार नाना पटोले यांच्यासाठी महत्त्वाचीे आहे. त्यामुळेच ही पोटनिवडणूक हेवीवेट ठरत आहे. याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत नजर लागली आहे.
माजी खा. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. पटोले यांनी शेतकऱ्यांच्या ज्या मुद्दावर राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला. तसेच पोटनिवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही निवडणूक २०१९ च्या निवडणुकांची नांदी असल्याने ही जागा कायम ठेवणे भाजपासाठी प्रतिष्ठेचे झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुकडे आणि पटले हे उमेदवार असले तरी खरी लढत पटोले आणि फडणवीस यांच्यामध्येच असल्याची चर्चा या मतदार संघात आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र सुरूवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. त्यामुळेच या क्षेत्रातून राष्ट्रवादीने मधुकर कुकडे यांना उमेदवारी जाहीर केली.
या पोटनिवडणुकीत कुकडे यांच्या विजयासाठी खा. प्रफुल पटेल पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे. मागील दोन महिन्यापासून या क्षेत्रात सभा बैठकांच्या माध्यमातून पदाकारी, कार्यकर्ते आणि मतदारांच्या संपर्कात आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी कुकडे यांचे नाव ठरविल्याने त्यांच्या विजयासाठी पटेल, पटोले यांच्यासह सर्व नेते मेहनत घेत असल्याचे चित्र आहे. भाजपाने मतदार संघावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा कामाला लावला आहे.
नागपुरातील अनेक वरिष्ठ नेते यासाठी या लोकसभा क्षेत्रात तळ ठोकून आहेत. त्यामुळे भाजपाने ही पोटनिवडणूक फार गांर्भियाने घेतल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील एकूण १७ लाख ७० हजार मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यात जातीय समीकरण सुध्दा फार महत्त्वाचे ठरणार आहे. या दोन्ही जिल्ह्यात अडीच लाखांवर पोवार समाजाचे मतदार तर तीन लाखांवर कुणबी समाजाचे मतदार आहेत. तर युवा आणि नव मतदारांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या निवडणुकीचे समीकरण बºयाच प्रमाणात यासर्व गोष्टींवर सुध्दा अवलंबून आहे.
या लोकसभा क्षेत्रात आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये या दोन्ही समाजाच्या मतांची फार मोठी भूमिका राहीली आहे. या दोन्ही समाजाची मते घेण्यात ज्या पक्षाचा उमेदवार यशस्वी होईल, त्याचा विजयाचा मार्ग बºयाच प्रमाणात सुकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा वैयक्तीक दाडंगा जनसंपर्क सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सोशल मीडियावरून आगपखाड
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची सोशल मिडियावर सुध्दा चांगलीच चर्चा रंगली आहे. सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्हॉटसअ‍ॅप व फेसबुकवर एकामेकांच्या पक्षांच्या उमेदवारांची उणे दुणे काढत आहे. तर काहींनी घोषवाक्य सुध्दा तयार केले आहे. ना काँग्रेस ना रॉका आपला ताणू काका, ना इकडे तिकडे आपला भाऊ कुकडे असे घोषवाक्य ही घोष वाक्य सुध्दा मतदारांसाठी मनोरंजनात्मक ठरत आहेत. तर काही कार्यकर्ते विविध कार्टून तयार करुन मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करित आहे.
वादळाचा फटका
यंदा तापमानात चांगलीच वाढ होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सभांचे शेड्युल सांयकाळच्या वेळेत ठेवले आहे. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून तापमानात बदल झाला आहे. रविवार आणि सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळासह पावासाने हजेरी लावली. त्यामुळे याचा फटका विविध पक्षाच्या नियोजीत प्रचार संभाना बसला. काही ठिकाणच्या सभा सुध्दा रद्द कराव्या लागल्याची माहिती आहे.
प्रचार संभाना गर्दी जमविण्यासाठी दमछाक
भर उन्हाळ्यात लोकसभेची पोटनिवडणूक होत असल्याने आधीच मतदारांमध्ये उत्सुकता नाही. त्यातच शेतकरी सध्या खरीप हंगामपूर्व शेतीच्या कामात व्यस्त आहे. तर मजुरवर्ग तेंदूपत्ता आणि मनरेगाच्या कामांवर गेले आहे. त्यामुळे गावात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सामसूम असते. त्यामुळे दुपारच्या वेळेत सभा घेतांना गर्दी जमविताना उमदेवारांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
जे चार वर्षांत झाले नाही ते दहा महिन्यात होणार का?
या लोकसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला केवळ आठ ते दहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे ऐवढ्या कमी कालावधीत या मतदार संघातील विकास कामे, प्रलबिंत समस्या मार्गी लागणार का? असा सवाल सुध्दा मतदारांकडून केला जात आहे. कारण मागील चार वर्षांत या क्षेत्रात जी कामे झाली नाहीत ती दहा महिन्यात पूर्ण होणार का? अशी चर्चा सुध्दा मतदारांमध्ये आहे.

Web Title: The facade of the mausoleum and the glory of the giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.