३३०० हेक्टर जमिनीवर होणार सिंचनाची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:34 AM2017-10-11T00:34:46+5:302017-10-11T00:34:58+5:30

मध्यम प्रकल्प गोंदिया उपविभागांतर्गत येणाºया तेढवा शिवनी मध्यम प्रकल्पाचे काम केवळ २० टक्के पूर्ण झाले असून ८० टक्के काम बाकी आहे. हे काम जून २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले आहे.

Facility of irrigation to 3300 hectares of land | ३३०० हेक्टर जमिनीवर होणार सिंचनाची सोय

३३०० हेक्टर जमिनीवर होणार सिंचनाची सोय

Next
ठळक मुद्देतेढवा-शिवनी प्रकल्प : डावा कालवा पूर्ण, उजव्या कालव्याचे काम सुरू

देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मध्यम प्रकल्प गोंदिया उपविभागांतर्गत येणाºया तेढवा शिवनी मध्यम प्रकल्पाचे काम केवळ २० टक्के पूर्ण झाले असून ८० टक्के काम बाकी आहे. हे काम जून २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले आहे. हे काम पूर्ण झाल्यास ३ हजार ३०० हेक्टर सिंचन निर्मिती होणार आहे.
सद्यस्थितीत तेढवा-शिवनी मध्यम प्रकल्पाच्या पंप हाऊसचे काम पूर्ण झाले आहे. उर्ध्वनलिकेचे (पाईप लाईन) कामही १०० टक्के आटोपले आहे. तसेच डाव्या कालव्याचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे एक हजार ७०० हेक्टर जमिनीसाठी सिंचनाची सोय झाली आहे. तर उजव्या कालव्याचे काम सुरूच आहे. उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाल्यास त्याद्वारे एक हजार ६०० हेक्टरमध्ये सिंचनाची सोय होणार आहे.
सदर प्रकल्पासाठी सुरूवातील शेतकºयांनी जमिनी देण्यास नकार दिला होता. परंतु सदर प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये असल्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने भू संपादन करण्यात आले. तसेच जून २०१८ पर्यंत सदर प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर परिसरातील शेतकºयांच्या पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.
तेढवा-शिवनी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असले तरी यावर्षी त्याद्वारे सिंचनाची सोय होवू शकली नाही. जवळपास ८० टक्के काम सदर प्रकल्पाचे बाकीच आहे. विद्युत सयंत्र व तांत्रिक कामांची टेंस्टींग होणे अद्याप बाकीच आहे. सदर प्रकल्पाची सुधारित किंमत १०७ कोटी रूपये असून आतापर्यंत कामावर ७० कोटी रूपयांचा खर्च झालेला आहे.

तेढवा-शिवनी प्रकल्पाचे ८० टक्के काम बाकी आहे. सध्या उजव्या कालव्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये असल्यामुळे सदर प्रकल्प जून २०१८ पर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर ३३०० हेक्टर सिंचन निर्मिती होईल.
पी.डी. बडवाईक,
उपविभागीय अभियंता,
मध्यम प्रकल्प उपविभाग, गोंदिया.

Web Title: Facility of irrigation to 3300 hectares of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.