फडणवीस सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 08:54 PM2019-01-28T20:54:28+5:302019-01-28T20:54:43+5:30
महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात सिंचनावर विशेष भर देवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात सिंचनावर विशेष भर देवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लघू सिंचन,जलयुक्त शिवार, गाळमुक्त तलाव, तलाव खोलीकरण व पुनरुज्जीवन, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, उपसा सिंचन प्रकल्पांना विशेष निधी, भातखाचर दुरुस्ती कार्यक्रम, मग्रारोहयो माध्यमातून रस्ता खडीकरण व तिरोडा शहराकरिता शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन योजनेकरिता २७ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करुन दिला असून प्रत्यक्ष कामाला सुध्दा सुरुवात झाली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने दिलेल्या शब्द पूर्ण केला असल्याचे आ.विजय रहांगडाले यांनी सांगितले.
तालुक्यातील अर्जुनी, सेजगाव व कवलेवाडा क्षेत्र अंतर्गत शेतकºयांना सातबारा वाटप कार्यक्रम शनिवारी (दि.२६) पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, उपसभापती डॉ. वसंत भगत, जि.प.सदस्या राजलक्ष्मी तुरकर, कृउबास संचालक चत्रभूज बिसेन, तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, सरपंच कमलेश आतिलकर उपस्थित होते. रहांगडाले म्हणाले, केंद्र सरकारने उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांची धुरापासून मुक्तता करुन वृक्षतोड थांबविली. सर्व विभागाच्या योजनांचा प्रत्यक्ष जनतेस थेट लाभ डीबीटीच्या माध्यमातून कसा होईल यावर भर दिला आहे. महसूल विभागाने दिलेल्या निर्णयानुसार शेतकºयांचे सातबारा वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये हस्तांतरीत करुन वर्ग १ चा सातबारा उताºयाचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.