फडणवीसांना आत्मपरीक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:28+5:302021-03-26T04:28:28+5:30

अर्जुनी-मोरगाव : आपला पक्ष कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे, आपल्या पक्षाची राज्यात सत्ता असताना आपण काय केलं याचा ...

Fadnavis needs introspection | फडणवीसांना आत्मपरीक्षणाची गरज

फडणवीसांना आत्मपरीक्षणाची गरज

Next

अर्जुनी-मोरगाव : आपला पक्ष कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे, आपल्या पक्षाची राज्यात सत्ता असताना आपण काय केलं याचा विचार न करता इतरांवर आगपाखड करायची सवय भाजपच्या लोकांना आहे. मात्र आजचा मतदार सुजाण आहे. मतदारराजाला सर्व कळते. याचे भान भाजपच्या मंडळींनी ठेवावे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनाम्याची मागणी करावी, असे सूचक मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी व्यक्त केले.

सन २०१४ पूर्वी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असताना विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळाप्रकरणी आरोप करून सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर गावितांची मुलगी खासदार व ते आमदार झाले होते. सिंचन घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार व तटकरे यांच्याविरोधात जबरदस्त फटकेबाजी करत या घोटाळ्याचे गाडी भरून पुरावे दिले होते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. उलट अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना सभागृहात राणे यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना आरोप आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच वाचून दाखवली होती. तेच राणे भाजपचे खासदार अन् मुलगा आमदार झाला. त्याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँकेमध्ये घोटाळे झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी केली होती. सन २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर दरेकरांना भाजपमध्ये घेतले. विधान परिषदेतून त्यांना आमदार केले व आता ते विधान परिषदेत भाजपचे विरोधी पक्षनेते आहेत. मुख्यमंत्री असताना शिक्षकांचे वेतनखाते मुंबई बँकेत वळते केले. न्यायालयाने फटकारल्यानंतर बँक खाते मागे घेऊन तोंडघशी पडले होते. याच सभागृहात कृपाशंकर सिंह यांच्यावरील घोटाळ्याबद्दल आरोप केले होते. स्वतः मुख्यमंत्री व कृपाशंकर सिंह विरोधी पक्ष नेता असताना त्यांच्याविरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले. त्यांच्या कार्यकाळात नागपुरात गुन्हेगारी गोविंद पानसरे, शेतकरी धर्मा पाटील मृत्यूप्रकरण असे अनेक उदाहरणे आहेत. त्याचे उत्तर फडणवीस यांनी जनतेला दिले पाहिजेत अशी मागणी परशुरामकर यांनी केली आहे.

Web Title: Fadnavis needs introspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.