महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चेकपोस्टची बनावट पावती पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 09:47 AM2017-12-23T09:47:30+5:302017-12-23T09:50:10+5:30

महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या देवरी (सिरपूर चेक पोस्ट) वर शुक्रवारी (दि.२२) रोजी एका ट्रक चालकाकडून नोव्हेबर व डिसेबर महिन्याची बनावट सी.एफ (केज्युअल शुुुल्क) पावती पकडली.

The fake acknowledgment of checkpost on Maharashtra-Chhattisgarh border caught | महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चेकपोस्टची बनावट पावती पकडली

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चेकपोस्टची बनावट पावती पकडली

Next
ठळक मुद्देटोळी गवसण्याची शक्यता लाखों रुपयांच्या महसूलाला फटका

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या देवरी (सिरपूर चेक पोस्ट) वर शुक्रवारी (दि.२२) रोजी एका ट्रक चालकाकडून नोव्हेबर व डिसेबर महिन्याची बनावट सी.एफ (केज्युअल शुुुल्क) पावती पकडली. यामुळे सीमा तपासणी नाक्यावर खळबळ उडाली असून बनावटी पावती देणारी टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार सिरपूर सीमा तपासणी नाक्यावर वाहतूक निरीक्षक आनंद मोड हे वाहन चालकांकडील सी.एफ.पावत्यांची तपासणी करीत होते. या दरम्यान एका ट्रक चालकांने दिलेली पावती पाहुन त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मोड यांनी सदर ट्रक चालकाला पकडून त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. महाराष्ट सरकारला सर्वात जास्त महसूल देणाऱ्या देवरी चेक पोस्टवर दररोज तीन ते चार हजार वाहने ये-जा करतात.
वाहतूक निरीक्षकाद्वारे प्रत्येक वाहनाकडून सी.एफ. शुल्क एक हजार रुपये घेवून त्याची पावती दिली जाते. यातून दर महिन्याला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मागील काही दिवसांपासून बनावट पावती देणारी एक टोळी देवरी येथे सक्रीय असल्याची चर्चा होती. यापूर्वी देखील बनावट पावत्या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

असे फुटले बिंग
शुक्रवारी (दि.२२) देवरी चेक पोस्टवर कार्यरत वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी ट्रक क्र. एमएच १२ एलटी ४१७८ चे कागदपत्रे तपासले असता वाहन चालकाकडे नोव्हेंबर २०१७ ची ०७४२६०४ व डिसेंबर २०१७ ची २३३९५२ क्रमाकांची पावती आढळली. मोड यांनी दोन पावत्यांची नोंद रजिस्टमध्ये शहानिशा केली असता दोन्ही पावत्या बनावट असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही पावत्यांमध्ये एक-एक हजार रुपयाची नोंद असून प्रभारी अधिकारी सीमा तपासणी नाका देवरीचा शिक्का सुद्धा लावलेला आहे.

मागील वर्षी केली होती कारवाई
छत्तीसगड व महाराष्ट चेकपोस्टच्या बनावट पावत्या छत्तीसगड पोलिसांनी १२ जुलै २०१६ रोजी सिरपूर बागनदी येथील आरोपींना पकडले होते. त्यावेळी एक टोळी सुध्दा पोलिसांनी पकडली होती. २०१६ मध्ये सुध्दा वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी ट्रक चालकांकडून बनावट पावत्या पकडल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी (दि.२२) पुन्हा बनावट पावत्या पकडल्या. दरम्यान या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूला बुडत आहे.

Web Title: The fake acknowledgment of checkpost on Maharashtra-Chhattisgarh border caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.