गोंदियात कौटुंबिक न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2016 02:02 AM2016-02-28T02:02:35+5:302016-02-28T02:02:35+5:30
जिल्ह्यात कौटुंबिक कलहाचा निपटारा करण्यासाठी आता गोंदियात कौटुंबिक न्यायालय सुरू होणार आहे.
भाड्याच्या इमारतीचा प्रस्ताव : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन
गोंदिया : जिल्ह्यात कौटुंबिक कलहाचा निपटारा करण्यासाठी आता गोंदियात कौटुंबिक न्यायालय सुरू होणार आहे. परंतु इमारतीअभावी हे न्यायालय सुरू होण्याच्या प्रक्रियेला उशिर लागत आहे. उच्च न्यायालयाने ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार गोंदियात हे न्यायालय सुरू होणार आहे.
गोंदिया कौटुंबिक न्यायालय सुरू करण्यासाठी इमारत उपलब्ध नाही. त्या साठी हे न्यायालय सुरू करण्यासाठी दोन हजार स्केअर फुटच्या इमारतीची गरज असल्यामुळे भाड्याची इमारत जिल्हा न्यायालयाने शोधली आहे. जिल्ह्यात पती-पत्नीचे वाद, पोटगी प्रकरण, घटस्फोट या प्रकरणामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक प्रकरणे लांबणीवर जातात.
कौटुंबिक वादाचा निपटारा त्वरीत व्हावा यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयाने गोंदियात कौटुंबिक न्यायालय सुरू करण्याचे आदेश दिले. इमारतीसाठी जिल्हा सत्र न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे मागणी केली आहे. महिला व बाल लैगिक अत्याचाराच्या प्रकरणातही वाढ झाल्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय सुरू होणार होते. परंतु काही दिवसापूर्वी जिल्हा न्यायाधीश श्रीमती आनंद यांनी गोंदियात प्रभार स्विकारल्यामुळे त्यांच्याकडे महिलांसंबधी सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)