आधी तुझं माझं जमेना, आता तुझ्या वाचून करमेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:24 PM2021-09-24T16:24:21+5:302021-09-24T16:28:25+5:30
सन २०२१ च्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत १५० तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींपैकी ९७ प्रकरणांत महिलांच्या भरोसा सेलने पती-पत्नीत समेट घडवून आणला आणि त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला.
गोंदिया : व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेम प्रकरणे व अनैतिक संबंध यातून पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत.
मागील दोन वर्षांत पती-पत्नीत झालेला वाद हा पोलिसांपर्यंत पोहोचला. सन २०२१ च्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत १५० तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींपैकी ९७ प्रकरणांत महिलांच्या भरोसा सेलने पती-पत्नीत समेट घडवून आणला आणि त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला.
सन २०१९ मध्ये आलेल्या ३२६ तक्रारींपैकी १४८ प्रकरणांत समेट घडविला. सन २०२० या वर्षात २९१ तक्रारींपैकी १०० प्रकरणांत समेट घडवून आणले. जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या वर्षातील ५५ तक्रारींपैकी ९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्याला महत्त्वाचे कारण मोबाइल होते. घरात असलेली आर्थिक अडचण यामुळे पती-पत्नीत वाद होत असतात.
म्हणे, बायको वारंवार माहेरीच जाते
विविध व्यसन, पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर घेतला जाणारा संशय हा घराची शांती भंग करण्यास कारणीभूत होत असतो. यातून पती-पत्नीत क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून होणारे वाद विकोपाला जातात. नवऱ्याकडे नांदायला आलेली पत्नीही वारंवार माहेरी जात असल्याने पती पत्नीत वाद होत असतो.
जिल्ह्यातील सर्वच महत्वाच्या ठाण्यात भरोसा सेल
पती-पत्नीचे वाद सोडविण्यासाठी पोलीस विभागाकडून पोलीस ठाण्यात भरोसा सेल उभारण्यात आला आहे. या भरोसा सेलच्या माध्यमातून दाम्पत्यांचा वाद सोडविला जातो.
या कारणांमुळे पती-पत्नीचा वाद
पती मद्यपी, त्यातून पत्नीच्या चारित्र्यावर घेत असलेला संशय हा घराची शांती भंग करतो. मोबाईलचा होत असलेला अतिवापर यामुळे पती-पत्नीत वाद होतो. मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर महिलांची वाढलेली सक्रियता ही या वादाची कारणे आहेत.
वर्षभरात भरोसा सेलकडे आलेली प्रकरणे- १५०
प्रकरणात घडवून आणला समेट-९७