कर्मचाऱ्यांना लागू होणार कुटुंब निवृत्तीवेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:00 AM2019-09-17T06:00:00+5:302019-09-17T06:00:10+5:30
११ सप्टेंबरला चर्चेसाठी बोलाविले होते. त्यानुसार समन्वय समिती, सर्व प्रधान सचिव आणि वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीचे सर्व लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. वेतनत्रुटी, शिक्षण, आरोग्य, लिपीक संवर्ग, महिला, जि.प.कर्मचारी या मागण्याबाबत संबंधित विभागांशी चर्चा करुन लवकरच बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याने १३ सप्टेंबरपासून करण्यात येणारा बेमुदत संप मागे घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीद्वारे ९ सप्टेंबरला एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्व शाळा, कार्यालये बंद ठेवण्यात आली होती.
याची दखल घेत शासनाने समन्वय समितीला लेखी पत्र देऊन ११ सप्टेंबरला चर्चेसाठी बोलाविले होते. त्यानुसार समन्वय समिती, सर्व प्रधान सचिव आणि वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीचे सर्व लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. वेतनत्रुटी, शिक्षण, आरोग्य, लिपीक संवर्ग, महिला, जि.प.कर्मचारी या मागण्याबाबत संबंधित विभागांशी चर्चा करुन लवकरच बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याने १३ सप्टेंबरपासून करण्यात येणारा बेमुदत संप मागे घेण्यात आला. १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन कपातीवर आधारीत अंशदायी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना जुने निवृत्ती वेतन, कुटूंब निवृत्ती वेतन, ग्रॅच्युटी, अंशदान उपदान मिळणे बंद झाले आहे.सध्या राज्यात शेकडोे मृतक कर्मचाºयांची कुटुंब कठीण परिस्थितीत जीवन जगत आहे. त्यांना यापूर्वी शासनाकडून कुठलाही लाभ मिळत नव्हता. यामुळे ही कुटूंब उपासमारीचे जीवन जगत होती. कुटूंब व्यवस्थाच उद्ध्वस्त करु पाहणाºया या योजनेविषयी कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष होता. ९ सप्टेंबरला एकदिवसीय संप पुकारण्यात आला. याची दखल घेत शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत कुटूंब निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय घेतला. आचारसंहितेपूर्वी जीआर काढण्याचे आश्वासन दिले. इतर मागण्यांवर बैठका घेत तातडीने सोडवणूक केली जाणार आहे. महेद्र चव्हाण, एन. बी. बिसेन, प्रकाश ब्राम्हणकर, सुरेश रहांगडाले, आनंद सोनवाने, जैपाल ठाकूर, कोमल नेवारे, संजय धुर्वे, राम सोनटक्के, रोहीत हत्तीमारे, अंजन कावळे, संतोष हंबर्डे, प्रकाश कुंभारे, शांता रहांगडाले, ओमेश्वरी बिसेन, डी.टी.गिऱ्हेपुंजे, अशोक रावते, संतराम जाधव, डिलेश्वर टेंभरे, सुरेश मुधोळकर, राजेंद्र बोपचे पाठपुरावा केला.