शेतकरी दिंडीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 09:26 PM2017-12-25T21:26:00+5:302017-12-25T21:36:00+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. अविनाश काशिवार, नरेश माहेश्वरी, दिलीप बन्सोड, रमेश चुऱ्हे, गजानन परशुरामकर, नरेश भेंडारकर, सेवकराम रहांगडाले, माधव हटवार, निरज मेश्राम, रहांगडाले, एफ.टी. शहा, बाबोडे, दादोजी परशुरामकर, सुधाकर पंधरे, अग्रवाल, आनंद परशुरामकर, दामोदर बोपचे, परिसरातील सरपंच व उपसरपंच दिंडी अभियानात सहभागी झाले होते.
शेतकरी दिंडी अभियानाची सुरुवात होण्यापूर्वी प्रदेश प्रतिनिधी किसान सभा अध्यक्ष मनोहर चंद्रिकापूरे यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली जात असून शासनाने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकºयांना मिळाला नसल्याचे सांगत सर्व कर्ज माफ करण्याचे मागणी केली. सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना उत्पादक खर्चाचा दिडपट भाव देणे, ३०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बोनस जाहीर करणे गरजेचे आहे, परंतु शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही सरकार शेतकऱ्यांची नाही कार्पोरेट लोकांची असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी सरकाच्यजा कानपिचक्या घेतल्या. ते म्हणाले, शरदचंद्र पवार यांनी शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ केले होते. परंतु या परिसरातील मंत्री असून सुद्धा सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी परिसरातील शेतकºयांचा दुष्काळ घोषित करण्यात आला नाही. तिरोडा, गोरेगाव, गोंदिया तहसीलचा सर्व शेतकऱ्यांचा मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला. त्यामुळे येणाºया ३० डिसेंबरला जेलभरो आंदोलन खा. प्रफुल्ल पटले यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अधिक संख्येत भाग घेण्याचे आवाहन केले.
शेतकरी दिंडी अभियान २५ ते २९ डिसेंबर २०१७ पर्यंत पांढरी, डव्वा, सौंदड, चिखली, शेंडा अशा प्रकारे जिल्हा परिषद क्षेत्रातील गावामध्ये दिंडी काढून सर्व शेतकरी जनतेला शासन विषयी जनजागृती करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका सडक अर्जुनी अवलंबविण्यात आले आहे.
संपूर्ण सडक-अर्जुनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी या दिंडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.