शेतकºयाने फुलविली केळीची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:39 PM2017-10-13T23:39:04+5:302017-10-13T23:39:22+5:30
रोगांचा प्रादुर्भाव व पावसाचा अभाव यामुळे होणाºया नापिकीने कंटाळून धानपिकाला बगल देत लेंडेझरी येथील एका शेतकºयाने केळीची बाग फुलविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : रोगांचा प्रादुर्भाव व पावसाचा अभाव यामुळे होणाºया नापिकीने कंटाळून धानपिकाला बगल देत लेंडेझरी येथील एका शेतकºयाने केळीची बाग फुलविली. जवळापास एक एकर शेतीत त्याने सव्वा लाखाचे उत्पादन घेत इतर शेतकºयांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे.
कोसमतोंडी परिसरातील लेंडेझरी येथील शेतकरी अरविंद शामराव समरीत हे वडिलोपार्जित जमिनीवर वर्षानुवर्षे धानाची लागवड करीत होते. रोग व पावसाने पिकांचे नुकसान होत होते. जेवढा पैसा शेतीमध्ये लावत होते तेवढाही निघत नव्हता. त्यामुळे शेवटी कंटाळून त्यांनी नगदी पीक घेण्याचा संकल्प केला. धानाऐवजी केळीची बाग लावण्याचा निर्णय घेतला.
सन २०१६ मध्ये त्यांनी केळीची बाग लावली व एक एकर शेतीमध्ये एक ते सव्वा लाख रुपयांच्या केळी विकल्या. यंदा सुद्धा केळीची बाग लावण्यात आली व केळी तोडून विक्रीला नेले जात आहे. यावर्षी सुद्धा एक ते दीड लाख रूपये नफा होईल, अशी असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. शेतकºयांनी पारंपारिक धान पिकाऐवजी नगदी पिकाची लागवड करण्याकडे वळले पाहिजे. परिसरातील शेतकºयांनी धानापेक्षा केळी लागवडीतून जास्त उत्पन्न घेऊ शकतात.