शेतकरी मित्रांची आढावा सभा व प्रशिक्षण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:26 AM2021-01-18T04:26:33+5:302021-01-18T04:26:33+5:30

सभेला आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यु. आर. सोनेवाने व अरविंद उपवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेत माती नमुना कसा घ्यावा, ...

Farmer Friends Review Meeting and Training () | शेतकरी मित्रांची आढावा सभा व प्रशिक्षण ()

शेतकरी मित्रांची आढावा सभा व प्रशिक्षण ()

googlenewsNext

सभेला आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यु. आर. सोनेवाने व अरविंद उपवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेत माती नमुना कसा घ्यावा, नमुना घेताना घ्यावयाची काळजी तसेच माती परीक्षणाचे फायदे याबाबत सांगण्यात आले. सोनेवाने यांनी हरभरावरील किडरोग व्यवस्थापन तसेच पक्षी थांबे, कामगंध सापळे याविषयी माहिती दिली. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना याबाबतची माहिती देण्यास सांगितले. तर उपवंशी यांनी शेतकरी मित्रांना उन्हाळी भात नर्सरी व्यवस्थापन तसेच गहू पिकावरील कीड-रोग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. विकेल ते पिकेल संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाविषयी माहिती दिली. स्मार्ट प्रकल्पाबाबत माहिती दिली. याप्रसंगी मोहाडीकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करावेत, जेणेकरून इतर शेतकरी त्याचे अनुकरण करतील, अशा सूचना दिल्या. तसेच सर्वांनी शेतकरी मासिक वर्गणीदार व्हावे, असे सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या शेतात जैविक खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहील, असेही सांगितले. यावेळी मंडल कृषी अधिकारी पी. पी. खंडाईत, पीक विमा प्रतिनिधी राहुल कटरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Farmer Friends Review Meeting and Training ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.