शेतकरी सुखावला

By admin | Published: July 11, 2015 02:04 AM2015-07-11T02:04:16+5:302015-07-11T02:04:16+5:30

गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली.

The farmer has dried | शेतकरी सुखावला

शेतकरी सुखावला

Next

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : अखेर रोवण्यांना सुरूवात, उकाड्यापासून दिलासा
गोंदिया/देवरी : गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. त्यामुळे मरणासन्न झालेल्या धानाच्या रोपट्यांना जीवदान मिळाले आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे.
गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण देवरी तालुका ओलाचिंब झाला आहे. तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे सुखावला आहे. तसेच दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने लोकांना मागील पंधरा दिवसांपासून होत असलेल्या उकाडयापासून दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नाही त्या शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या रोपांना या पावसाने मोठे जीवनदान मिळाले आहे. काही शेतकऱ्यांची लागलीच रोवणीलाही सुरूवात केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मान्सुनच्या पावसाने बळीराजा कामाला लागला होता. शेतात बीजे टाकल्याच्या कामाला वेग आला होता. परंतु मागील पंधरा दिवसाप्ाांसून पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत पडला होता. महागडे बियाणे टाकून केलेली पेरणी वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट तर येणार नाही? हा प्रश्न शेतकल्याला भेडसावत होता. परंगु गुरुवारपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसाधारण माणुससुद्धा सुखावला आहे.
या सत्ांतधार पावसाने लोकांना जरी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरी वातावरणातील उकाडा चांगलाच दूर झाला आहे. गर्मीपासून सुटका मिळाल्याचा आनंद लोक व्यक्त करीत आहेत. इंद्रदेवतेचे आभार मानीत आहेत.
या पावसामुळे बाजारात छत्री व रेनकोट तसेच मोऱ्या घेणाऱ्यांची गर्दी बघायला मिळत आहे. ग्रामीण क्षेत्रातील रस्ते चिखलाने माखले असून ये-जाणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस होत असल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत होती. एकंदरित नफा-नुकसान बघता सर्वांनीच या पावसामुळे आनंद व्यक्त केला आहे. दिवसभर आकाशात काळे ढग असल्याने व पावसाच्या रीपरिपीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की अशाच पावसामुळे रोवणीला गती मिळाने आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरूवात झाली. तिसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने सर्वांनाच हायसे वाटले. त्यातच शेतकऱ्यांनी धानाचे बियाणे घेऊन लागवड केली. पण नर्सरीची लागवड झाल्यानंतर पावसाने दडी मारून शेतकऱ्यांना चांगलेच चिंतेत टाकले होते.
यावर्षी पाऊस अनियमित असल्याने नर्सरी टाकताना एकाच वेळी टाकू नका असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेत पूर्ण नर्सरी लावली नाही. मात्र ज्यांनी आधी लागवड केली होती त्यांचा जीव टांगणीला लागला होता. रोपे मोठी होऊन रोवणीची वेळ आली असताना पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे लागल्या होत्या. अनेकांनी वरुणराजाला साकडे घालणे सुरू केले होते. अखेर गुरूवारी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही पाऊस सुरू असल्याने रोपांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. येत्या १५-२० दिवसात रोवणीच्या कामांना चांगलाच वेग येणार आहे. (जिल्हा / तालुका प्रतिनिधी)

Web Title: The farmer has dried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.