‘तो’ शेतकरी दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:06 AM2017-10-08T00:06:21+5:302017-10-08T00:06:30+5:30
भंडगा येथील शेतीच्या रस्त्याच्या वादावरुन प्रकरण चांगलेच चिघळले आहे. प्रशासनाने रस्ता मोकळा करुन देण्याचे लेखी आश्वासन न दिल्याने तो शेतकरी शनिवारी (दि.७) दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : भंडगा येथील शेतीच्या रस्त्याच्या वादावरुन प्रकरण चांगलेच चिघळले आहे. प्रशासनाने रस्ता मोकळा करुन देण्याचे लेखी आश्वासन न दिल्याने तो शेतकरी शनिवारी (दि.७) दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच होता. त्याची समजूत घालण्यात प्रशासनाला यश आले नव्हते.
भंडगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांच्या शेतात जाणाºया रस्त्यावर ६ आॅक्टोबर रोजी प्रशासनाने दोन ट्रॅक्टर मुरुम टाकले. मात्र दमाहे कुटुंबीयांनी शेतात येवून सहकुटुंब आत्महत्या करण्याची धमकी दिली. यातील नानेश्वर दमाहे या युवकाने थाईमेट पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला वेळीच जिल्हा रुग्णालयात दाखल करुन व त्याच्या कुटुंबाला ताब्यात घेतले. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून प्रशासनाने शेतात जाणाºया रस्त्यावर मुरुम टाकने बंद केले. मुरुम टाकणे बंद केल्याची बातमी वाºयासारखी पसरली, त्या विषयी कटरे यांनाही त्यांच्या समर्थकांनी माहिती दिली. त्यामुळे कटरे यांनी पुन्हा टोकाची भूमिका घेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी टाकीवरुन खाली उतरणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली. यावेळी मात्र प्रशासन, पोलीस विभाग किती कमजोर आहे या चर्चेने वातावरण ढवळून निघाले. विशेष म्हणजे शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांना प्रशासन न्याय मिळवून देईल का? अशी चर्चा गावकºयांमध्ये होती. शेतकरी दमाहे कुटुंबाने ६ आॅक्टोबर रोजी शेतात येऊन रस्ता तयार करु देणार नाही, अन्यथा सहकुटुंब आत्महत्या करु असा पवित्रा घेत प्रशासनाला चांगलेच वेठीस धरले. मात्र प्रशासन, पोलीस विभाग मूग गिळून गप्प होते. दमाहे कुटुंबातील नानेश्वर दमाहे यांनी प्रथम शेतात येवून थायमेट आणल्याचे दुरध्वनीवरुन सांगितले व लगेच अर्ध्या तासात त्याचे कुटुंबिय शेतात आले. त्यांनी थायमेट पिण्याचा प्रयत्न केला. यातील नानेश्वर दमाहेने थायमेट पिवून पोलीस विभागाची हवा गुल केली. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर प्रशासनाची एवढी तारांबळ उडाली नसती.
दमाहे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
गोरेगाव तालुक्याच्या भडंगा येथील वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण करणाºयांना हटविण्यास गेलेल्या नायब तहसीलदाराला धमकी देत त्यांच्यासमोर विष प्राशन केले. या संदर्भात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी २.४५ वाजता आरोपी ज्ञानेश्वर यशवंतराव दमाहे (३८), निवृत्त यशवंतराव दमाहे, दीपक यशवंतराव दमाहे, किशोर यशवंतराव दमाहे व दमाहे कुटुंबातील दोन महिला अशा सहा जणांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. नायब तहसीलदार नरेश महादेव वेदी (५३) यांच्या तक्रारीवरुन गोरेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम २४३, १४६, ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शेतकरी बसणार उपोषणाला
कोमलप्रसाद कटरे याने शुक्रवारपासून विरुगिरी आंदोलन सुरू केले आहे. कटरे यांची मागणी योग्य असून त्याला समर्थन देण्यासाठी भंडगा येथील २० ते २५ शेतकरी रविवारपासून उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे.