रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2017 12:13 AM2017-05-15T00:13:31+5:302017-05-15T00:13:31+5:30
गुरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याला रानडुकराने हल्ला करून जखमी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गुरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याला रानडुकराने हल्ला करून जखमी केले. तालुक्यातील ग्राम इर्री येथे रविवारी (दि.१४) सकाळी ११ वाजता दरम्यान ही घटना घडली.
इर्री येथील शेतकरी मोतीराम रामाजी तरोणे (७०) हे गावालगत असलेल्या शेतात गुरे चारण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजता गेले असताना रानडुकरांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला, कमरेला, खांद्यावर व इतर ठिकाणी गंभीर जखमा आहेत. त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वनविभागाने त्यांना सानुग्रह मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
गोंदिया : गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पारडीबांध येथील झुलन ओमनलाल लिल्हारे (५०) यांच्यावर रानडुकराने शुक्रवारी सायंकाळी हल्ला केल्याने त्यांना उपचारासाठी रात्री येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.