धानावरील रोगांनी शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:28 PM2017-10-21T23:28:04+5:302017-10-21T23:28:18+5:30

पावसाच्या लहरीपणामुळे हवालदील झालेला शेतकरी, धानपिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे पुरता बेजार झालेला आहे. समोर आलेला तोंडाचा घास हिरावला जातो की काय?

Farmer Sickness with Routine Diseases | धानावरील रोगांनी शेतकरी बेजार

धानावरील रोगांनी शेतकरी बेजार

Next
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : अस्मानी -सुलतानी संकटांनी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : पावसाच्या लहरीपणामुळे हवालदील झालेला शेतकरी, धानपिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे पुरता बेजार झालेला आहे. समोर आलेला तोंडाचा घास हिरावला जातो की काय? अशी भिती शेतकºयांसमोर निर्माण झाली आहे.
ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर तुडतुडा या रोगाची सर्वात जास्त लागण झाली आहे. उष्ण-दमट वातावरणात या रोगाचा झपाट्याने धानपिकांवर प्रसार होतो. शेतकरी हजारो रुपयांची औषधी खरेदी करुन हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी करित आहे. परंतु, तुडतुडा हा नियंत्रणात येत नाही. याबरोबरच पेरवा, फंगीसाईट, रस शोषणारा तांबडा, पांढरा मावा, पाने गुंडाळणारी अळी, त्रिफुली आदी रोगांचे आक्रमण सध्या धान पिकांवर पाहायला मिळत आहेत.
धानपिक आता निसवले आहे. जास्त मुदतीचे धानपिक निसवत आहे. परंतु निसवलेल्या लोंबात दाने भरलेले नाही. पेरव्यामुळे अपेक्षित धानाचे उत्पन्न निघणार की नाही अशी चिंता शेतकºयाला सतावत आहे. पूर्वी सारखी दर्जेदार किटकनाशक उपलब्ध होत नसल्याने कीडरोग आटोक्यात आणण्यास अडचण निर्माण होत आहे. फवारणी केल्यानंतरही धानपिकांवरील रोग नियंत्रणात येत नसल्याचे येथील शेतकरी मोहन कापगते यांनी सांगितले. आधीच पावसाच्या लहरीपणाला तोंड देत शेतकºयांनी कशीबशी धानाची रोवणी केली. परंतु आता पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकºयांचा तोंडचा घास हिरावला जातो की काय? अशी चिंता शेतकºयांना सतावित आहे. दरम्यान बोंडे (खोली) येथील शेतकरी लालचंद काशिवार हे मंगळवारी (दि.१७) शेतात फवारणी करण्यासाठी पाण्यात औषधी मिसळवित असताना त्यांना विषबाधा झाली. ते गोंदिया येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. बनावट कंपनीच्या बियाणांमुळे आधीच शेतकºयांचे नुकसान झाले. तर आता रोगनियंत्रक औषधी कंपन्या शेतकºयांच्या जीवावर उठल्या आहेत. सुल्तानी व अस्मानी संकटांनी शेतकरी त्रस्त झाला आहे.
१२-१३ आॅक्टोबर रोजी आलेल्या वादळामुळे देवलगाव व लगतच्या गावात उभे पीक जमिनीवर पडले. त्यामुळेही परिसरात धानपिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. देवलगाव येथील शेतकरी युवराज नंदागवळी यांच्या दोन एकर शेतात उभे असलेले धानपिक तुडतुळा व मावा या रोगाने पुरते नष्ट झाले आहे. चार-पाच वेळा औषधी फवारणी केली परंतु त्याचा फायदा झाला नाही. कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क केला असता त्यांनीही ढगाळ वातावरण हे या रोगाला पोषक आहे. त्यांनीही यावर हमखास उपाय नाही, असे सांगितले. त्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कीडरोगामुळे धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना मदत देण्याची मागणी शेतकºयांनाकडून होत आहे. नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना पीक विमा योजनेतंर्गत लाभ देण्यात यावा. या मागणीचे निवेदन देखील शेतकºयांनी कृषी विभागाला दिले.

१२ व १३ आॅक्टोबर रोजी वादळी पावसामुळे धानपिकांच्या नुकसानीबाबत देवलगाव, सुकळी, बाराभाटी येथील शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांची पाहणी करुन प्राथमिक अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यावर प्रत्यक्ष पाहणी व शेतीचे पंचनामे होतील. प्रत्यक्ष सर्वेक्षण झाल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल.
- संजय रामटेके
मंडळ कृषी अधिकारी
नवेगावबांध

Web Title: Farmer Sickness with Routine Diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.