‘मागेल त्याला शेततळे’ १०८ टक्के उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:11 AM2019-03-10T00:11:36+5:302019-03-10T00:12:19+5:30

शाश्वत शेती व दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाव्यतिरिक्त राज्य सरकारतर्फे ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘ मागेल त्याला बोडी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याने १०८.३३ टक्के उद्दीष्ट पूर्ती केली आहे.

The farmer will ask him to complete 108 percent of the target | ‘मागेल त्याला शेततळे’ १०८ टक्के उद्दिष्ट पूर्ण

‘मागेल त्याला शेततळे’ १०८ टक्के उद्दिष्ट पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्दे७३ टक्के कामांचे फोटो अपलोड : ६५० पैकी ६३८ लाभार्थ्यांना अनुदान वाटप

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शाश्वत शेती व दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाव्यतिरिक्त राज्य सरकारतर्फे ‘मागेल त्याला शेततळे’ व ‘ मागेल त्याला बोडी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याने १०८.३३ टक्के उद्दीष्ट पूर्ती केली आहे. ६५० शेततळी व बोडीचे ६३८ चे अनुदान वितरीतकरण्यात आले. उर्वरीत लाभार्थ्यांना अनुदान देण्याची प्रक्रीया सुरू आहे.
जिल्ह्याला सन २०१६-१७ व २०१७-१८ यासाठी ४५० शेततळे व बोडी तयार करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु जिल्हा कृषी विभागाने ३१ मार्च २०१८ पर्यंत उद्दीष्ट पूर्ती केली. यानंतर एप्रिल महिन्यात जिल्हा कृषी विभागाच्या मागणीवर शासनातर्फे १५० शेततळे व बोडी मंजूर करण्यात आले होते. जिल्ह्यात ६०० शेततळे-बोडीचे काम उद्दीष्टापेक्षा अधिक असून ६५० चे काम १ मार्च २०१९ पर्यंत पूूर्ण करण्यात आले.
बोडी-शेततळ्यासाठी २०५८ लोकांनी सेवा शुल्कासह अर्ज सादर केले होते. यापैकीे १५३५ शेतकऱ्यांना पात्र तर ४५६ शेतकऱ्यांना अपात्र केले होते. ६७ अर्जाची छाणणी करण्यात आली नाही.
पूर्ण झालेल्या बोडी व शेततळे यात गोंदिया ८८, तिरोडा १३३, गोरेगाव १३८, अर्जुनी मोरगाव ३९, देवरी १३६, आमगाव ५५, सालेकसा ५४ व सडक-अर्जुनी ७ चा समावेश आहे.

४७६ शेततळे व बोडींचे फोटो अपलोड
तयार करण्यात आलेल्या ६३५ शेततळे व बोडींपैकी ४७६ चे फोटो आॅनलाईन अपलोड करण्यात आले असून उर्वरीत काम सुरू आहे. यात गोंदिया तालुक्यात ४६, तिरोडा ५३, गोरेगाव १३१, अर्जुनी-मोरगाव ३९, देवरी ११०, आमगाव ५१, सालेकसा ४१, सडक-अर्जुनी ५ शेततळे व बोडींचा समावेश आहे.

६.३५ कोटी वाटप
सन २०१६-१७, सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये आतापर्यंत लाभार्थ्यांना ६ कोटी ३५ लाख रूपये वाटप करण्यात आले. जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये १९३ शेततळे व बोडींचे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी ८२ लाख ६० हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला. तर सन २०१७-१८ मध्ये मार्च अखेरपर्यंत १ कोटी २ लाख रूपये वाटप करण्यात आले. एप्रिलपासून आतापर्यंत १ कोटी ३ लाख ८० हजार ३८९ रूपये खर्च करण्यात आले.

Web Title: The farmer will ask him to complete 108 percent of the target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.