जलयुक्त शिवाराने फुलली १३ गावांतील शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2017 12:51 AM2017-01-22T00:51:13+5:302017-01-22T00:51:13+5:30

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अंतर्गत वर्ष २०१५-१६ मध्ये सालेकसा तालुक्यात एकूण १२१ कामापैकी १०९ कामे पूर्ण झाली आहेत.

Farmers from 13 villages in full swing water | जलयुक्त शिवाराने फुलली १३ गावांतील शेती

जलयुक्त शिवाराने फुलली १३ गावांतील शेती

Next

 दीड कोटींची १०९ कामे पूर्ण : जनावरे व वन्यजीवांसाठी वरदान
विजय मानकर  सालेकसा
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अंतर्गत वर्ष २०१५-१६ मध्ये सालेकसा तालुक्यात एकूण १२१ कामापैकी १०९ कामे पूर्ण झाली आहेत. या तालुक्यातील १३ गावे यंदा सुलजाम-सुफलाम झाल्याचे चित्र उभे आहे. त्यामुळे अनेक प्रकारे पाण्याची समस्या दूर झाली आहे. जनावरे व वन्यप्राणी, पक्षी आणि वनराईसाठी जलयुक्त शिवार योजना ठरदान ठरत आहे.
२०१५-१६ या आर्थिक वर्षात सालेकसा तालुक्याला जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा या पद्धतीवर विविध कामासाठी एकूण १ कोटी ७१ लाख ८० हजार ८७० रुपये एवढी रक्कम प्रशासनाकडून मंजूर करण्यात आली होती. यात १२१ कामांचा समावेश होता. यात बोडी दुरुस्ती, नाला खोलीकरण, शेततळे, गॅवियन बंधारे, जूनी बोडी सुधारणे, भात खाचर दुरुस्ती, मानाबा, किनाबा इत्यादी कामाचा समावेश आहे. मागील वर्षी ज्या १३ गावांमध्ये जलयुक्त शिवार आणि अंतर्गत पाणी साठविण्यासाठी विविध कामे करण्यात आली. त्यापैकी बहुतेक गावे वनव्याप्त परिसरात असल्याने जलयुक्त शिवारामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. तर त्याच परिसरात वनराईने हिरवेगार महत्व टिकवून आहे. जलयुक्त शिवाराच्या पाण्यामुळे खरीप पिकाबरोबर रब्बी पिकासाठी सुद्धा पाण्याची सोय झाली आहे. त्याचबरोबर शिवारात विचरण करणाऱ्या जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सुलभ सोय झाली आहे. एवढेच नाही तर पाणी आल्यावर दुसऱ्या जंगल क्षेत्रात पलायन करणाऱ्या वन्यजीवांसाठी पाण्याची सोय झाल्याने तालुक्यात वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे, असे वनविभागाचे कर्मचारी अनुभवातून सांगत आहेत. त्यामुळे प्राकृतीक सौंदर्यीकरण सुद्धा वाढलेला असल्याचे दिसत आहे.
शासनाने मंजूर केलेल्या १ कोटी ७१ हजार ८० हजार ८७० रुपये रक्कम पैसी मागील वर्षात १ कोटी ४७ लाख ९ हजार १६५ रुपयाचे काम पूर्ण झालेले आहेत. यात ११ गावात एकूण १०९ कामे पूर्ण होऊन पाणी साठविण्यासाठी योग्य करण्यात आले होते. प्रत्यक्ष अनुभव आणि लाभ आता पावसाळ्याच्या चार महिन्यानंतर सारखा मिळताना दिसत आहे. तेथील जलसाठा पूर्ण वर्षभर टिकून राहील आणि लोकांना त्याचा लाभ घेता येईल.
सालेकसा तालुक्यातील १३ गावामध्ये विचारपूर परिसरात बोडी दुरुस्तीची एकूण १५ कामे करण्यात आले. यासाठी ७ लाख ८४ हजार ८५५ रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. माती नाला बांधकाम अंतर्गत ८ लाख ६५ हजार रुपयाची तीन कामे पूर्ण करण्यात आली. दललदकूही परिसरात ४ लाख ५० हजार रुपयतून आठ ठिकाणी बोडी दुरुस्तीची कामे करण्यात आली. ४ लाख ९८ हजार ५८३ रुपयाच्या निधीतून १० बंधारे बनविण्यात आले. २ लाख २६ हजार ८०१ रुपयाच्या निधीतून एक नाला खोलीकरण, २ लाख ५७० रुपयाचे खर्चातून दोन ठिकाणी नाल्याचे गाळ काढण्याचे कामे करण्यात आली. टोयागोंदी परिसरात २ लाख ४० हजार ७०८ रुपये किमतीचे पाच बोडी दुरुस्तीची कामे, १४ लाख ४० हजाराचे पाच माती नाला बांधकाम, ८ लाख ११ हजार ३४ रुपयांचा एक सिमेंटनाला बांधकाम, १ लाख १५ हजार ७५५ रुपयाचे शेततळे, ४ लाख ६० हजार ७८० रुपयाच्या निधीतून दोन नाल्याचे खोलीकरण आणि १ लाख ९५ हजार १८६ रुपयाच्या निधीतून चार गॅबियन बंधारे तयार करण्यात आले. कोपालगड परिसरात २ लाख २० हजार ३३३ रुपये निधीचे ४ बोडी दुरुस्तीची कामे, ८ लाख ६० हजार रुपये किमतीचे तीन माती नाला बांधकाम, १३ लाख ७९ हजार ४०३ रुपये किमतीचे चार नाल्यांचे खोलीकरण, २ लाख ४६ हजार ६९६ रुपये किमतीचे दोन ठिकाणी शेततळे तयार करण्यात आले.
दरेकसा परिसरात ५४ हजार ७१२ रुपये किमतीतून बोडी दुरुस्तीची कामे, ५ लाख ८५००० रुपये किमतीचे दोन माती नाला बांधकाम, ७ लाख २२ हजार १६० रुपये किमतीचे एक सिमेंट नाला बांधकाम, १ लाख १५ हजार ७५५ रुपये किमतीचा एक शेततळा, ५ लाख ३४ हजार १३६ रुपये किमतीचे दोन मातखाचार दुरुस्ती आणि ५ लाख २१ हजार ६६१ रुपये किमतीचे दोन ठिकाणी नाला खोलीकरण कामे पूर्ण करण्यात आले.
जमाकुडो परिसरात ५५ हजार रुपये बोडी दुरुस्यी, १ लाख १५ हजार ७५५ रुपयाचे एक शेततळे, १३ लाख ४१ हजार १३२ रुपये किमतीचे पाच ठिकाणी नाला खोलीकरण, ११ लाख ८४ हजार २०६ रुपये किमतीतून चार ठिकाणी भातखाचर दुरुस्ती, आणि ३ लाख ८३ हजार ३०८ रुपये किमतीचे नऊ ठिकणी जुनी बोडी खोलीकरण कामे करण्यात आले. झालिया येथे १ लाख ९४ हजार ३३५ रुपयाचे एक ठिकाणी नाला खोलीकरण, गोंडीटोला येथे १ लाख १ हजार ९७४ रुपये किमतीचे दोन नाला खोलीकरण कामे करण्यात आली.
चांदसूरज येथे २ लाख ७४ हजार ७६७ रुपयाचे एक नाला खोलीकरण आणि २ लाख ७ हजार २७ रुपयाचे एक ठिकाणी नाला गाळा काढण्याची कामे करण्यात आली. नानव्हा येथे १८ हजार ३१७ रुपये किमतीचे भातखाचर दुरुस्ती आणि धानोली येथे २८ हजार ७४२ रुपये किमतीचे दोन भातखाचर दुरुस्तीची कामे करण्यात आली.

साडेबारा लाखांची कामे शिल्लक
नियोजीत गावामध्येच तीन गावातील १२ लाख ६२ हजार ४१० रुपये किमतीची १२ कामे शिल्लक असून त्याचा लाभ परिसराला मिळणार आहे. यात दलदलकुही येथे ४ लाख ६३ हजार १० रुपये किमतीचे चार शेततळे, ५५ हजार ११४ रुपये किमतीचे एक बोडी दुरुस्तीचे काम, दरेकसा येथे ६ लाख ९४ हजार ५६० रुपये किमतीचे सहा शेततळे, जमाकुडो येथे ४९ हजार ७४६ रुपयाचे एक बोडी दुरुस्तीच्या कामाचा समावेश आहे. पूर्ण अपूर्ण कामापैकी एकूण २० लाख ७५ हजार ८२० रुपये एवढी रक्कम शिल्लक आहे. मात्र आजपर्यंत जेवढी कामे करण्यात आली. त्यातूनच त्या-त्या गावांना व पसिराला जलयुक्त शिवारचा अभूतपूर्व लाभ मिळत आहे.
 

Web Title: Farmers from 13 villages in full swing water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.