शेतकरी कृषी मेळावा
By admin | Published: January 6, 2016 02:19 AM2016-01-06T02:19:41+5:302016-01-06T02:19:41+5:30
ग्रामपंचायतच्या सभागृहात शेतकरी कृषी मेळावा आयडीबीआय बँकेच्या वतीने घेण्यात आला. यात बहुतांशी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
मुंडीकोटा : ग्रामपंचायतच्या सभागृहात शेतकरी कृषी मेळावा आयडीबीआय बँकेच्या वतीने घेण्यात आला. यात बहुतांशी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
महिला बचत गटातील महिला व गावकरी महिला आणि सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. शेतकरी कृषी मेळाव्यात तिरोडा तालुका कृषी मंडळ अधिकारी पोटदुखे, पंचायत समिती कृषी अधिकारी चरडे तिरोडा, अनुप बोपचे, हेमंत नागपुरे, माणिकराव डोंगरे कार्यक्रमात उपस्थित होते.
यावेळी आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक सुयोग चव्हाण, रजनीश गजभिये, राजीव पराते, अरविंद भावे, बाळकृष्णा रामटेके, मंदा भेलावे, योगेश भांडारकर, प्रकाश शहारे या सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक भावे यांनी केले. शाखा व्यवस्थापक चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या बँकेत बऱ्याच योजना आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. त्याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा ८ अ, ७/१२ चा उतारा, शेतीचा नकाशा तसेच संयुक्त शेतजमीन असल्यास संमतीपत्र आवश्यक आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहो, असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी शाखा व्यवस्थापक यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्या चार व्यक्तींचा पुष्पगुच्छ देवून सतर केला. यात टोलीराम पटले, माणिक डोंगरे, अनुष बोपचे, संतोष बोहरे यांचा समावेश आहे. शेवटी शेतकऱ्यांच्या आधारावर चित्रपट दाखविण्यात आले. आभार व्यवस्थापक सुयोग चव्हाण यांनी केले.
तालुका मंडळ कृषी अधिकारी पोटदुखे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक योजनाविषयी मार्गदर्शन केले. धान शेतीऐवजी फळबाग शेती करणे या वेळी गरजेचे आहे. त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जावून विचारपूस करणे फार महत्वाचे आहे. (वार्ताहर)