कामठा मंडळ अधिकारी यांची शेतकऱ्यांनी केली तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:38+5:302021-05-07T04:30:38+5:30
खातिया : गोंदिया तालुक्यातील कामठा क्षेत्राचे मंडळ अधिकारी पी.एम.लोहकर हे फेरफार करण्यासाठी पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला ...
खातिया : गोंदिया तालुक्यातील कामठा क्षेत्राचे मंडळ अधिकारी पी.एम.लोहकर हे फेरफार करण्यासाठी पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून सातबारा फेरफार व वर्ग दोनची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी मंडळ अधिकारी पाचशे रुपयांची मागणी करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच पैसे न दिल्यास फेरफारमध्ये त्रुट्या काढून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी लेखी निवेदन जिल्हा अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदन कटारे यांना दिले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. जि.प.सदस्य कुंदन कटारे यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चाैकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
.........
कोट
शेतकऱ्यांनी माझ्यावर केलेले आरोप तथ्यहीन असून मी कोणत्याही शेतकऱ्याला पैशाची मागणी केलेली आहे. हेतूपुरस्पर माझ्यावर आरोप करण्यात आले आहे.
- पी.एम.लोहकर, मंडळ अधिकारी.