शेतातील बांधीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By अंकुश गुंडावार | Updated: September 14, 2023 19:49 IST2023-09-14T19:49:19+5:302023-09-14T19:49:27+5:30
गुरुवारी दुपारी शेतातील पिकाची पाहणी करुन येतो असे सांगून घरुन गेले होते.

शेतातील बांधीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
तिरोडा : शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतातील बांधीत पडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी (दि.१४) दुपारी तालुक्यातील नवेगाव येथे घडली. रामदयाल केशव पटले असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रामदयाल पटले हे गुरुवारी दुपारी शेतातील पिकाची पाहणी करुन येतो असे सांगून घरुन गेले होते. पण बराच वेळ लोटूनही ते घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेण्यासाठी शेतावर गेले. दरम्यान शेतातील एका बांधित रामदयाल हे मृतावस्थेत आढळले. कुटुंबियांनी याची माहिती सरपंच दुर्गा नागदेवे व तिरोडा पोलिसांना दिली. तिरोडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिराेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणाचा तपास ठाणेदार देविदास कठाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार धावडे व अंबादे करीत आहेत.