गोंदिया जिल्ह्यात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 08:25 PM2020-04-01T20:25:54+5:302020-04-01T20:26:37+5:30
शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरुन बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला करुन ठार केल्याची घटना आमगाव तालुक्यातील किकरीपार येथे बुधवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरुन बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला करुन ठार केल्याची घटना आमगाव तालुक्यातील किकरीपार येथे बुधवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. भुसराम साधू मेश्राम (५५) रा.किकरीपार असे रानडुकराच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार भुसराम मेश्राम हे बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी काळजीपोेटी शेतात जाऊन पाहणी केली असता भुसारराम हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. याची माहिती गावकऱ्यांना होताच त्यांनी भुसाराम मेश्राम यांच्या शेताकडे धाव घेतली. तसेच याची माहिती वन विभागाचे अधिकारी आणि आमगाव पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह तपासणीसाठी पाठविला.