जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नगदी पिकाकडे वळावे

By admin | Published: July 3, 2016 01:48 AM2016-07-03T01:48:16+5:302016-07-03T01:48:16+5:30

माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी राज्यातील शेतीच्या विकासाचे स्वप्न बघितले होते. त्यांचे हे स्वप्न आता हळूहळू पूर्ण होताना दिसत आहे.

Farmers of the district should now turn to cash crops | जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नगदी पिकाकडे वळावे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नगदी पिकाकडे वळावे

Next

पालकमंत्री : यांत्रिकी शेती करण्याचा सल्ला
गोंदिया : माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी राज्यातील शेतीच्या विकासाचे स्वप्न बघितले होते. त्यांचे हे स्वप्न आता हळूहळू पूर्ण होताना दिसत आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी यांत्रिकी पध्दतीने शेती करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता नगदी पिकाकडे वळावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पालक सचिव डॉ.पी.एस.मीना, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यंवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.च्या उपाध्यक्षा रचना गहाणे, जि.प.च्या कृषि व पशूसंवर्धन समितीच्या सभापती छाया दसरे यांची उपस्थिती होते. याशिवाय मंचावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण व देवरीचे उपविभागीय कृषि अधिकारी युवराज शहारे होते.
पालकमंत्री म्हणाले, कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळागळातील शेतकऱ्यांपर्यत पोहोचवून त्यांना त्या योजनांचा लाभ द्यावा. जिल्हयाचा मानवी विकास निर्देशांक वाढला पाहिजे यासाठी कृषि विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. केंद्राने व राज्याने शेतकऱ्यांसाठी शेतकरी पिक विमा योजना व शेतकरी अपघात विमा योजना सुरु केल्या आहेत.या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. जिल्हयातील शेतकऱ्यांना आता भाजीपाला, उडीद, मुंग, यासह अन्य नगदी पिकाकडे वळण्यासाठी कृषि विभागाने प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी सांगितले. पालक सचिव डॉ.मीना म्हणाले, शेतकऱ्यांनी, कुकुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय यासारखे जोडधंदे करावे. (जिल्हा प्रतिनिधी)

फिरत्या भाजीपाला विक्र ी केंद्राचे उद्घाटन
राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्पाच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे पुरस्कृत शेतकरी ते ग्राहक थेट फिरत्या भाजीपाला विक्र ी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वाहनाला हिरवी झेंडी दाखवून केले. या फिरत्या भाजीपाला विक्री केंद्रामुळे ग्राहकांना थेट शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे. या विक्र ी केंद्रामुळे दलालाचे उच्चाटन होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Farmers of the district should now turn to cash crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.