नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:40 AM2018-08-25T00:40:36+5:302018-08-25T00:41:47+5:30

मागील वर्षी कीडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान शासनाने कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविला होता.

Farmers' Footpath for Compensation | नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची पायपीट

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची पायपीट

Next
ठळक मुद्देसाडेपाच हजार लाभार्थी प्रतीक्षेत : खाते क्रमांक चुकीचे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : मागील वर्षी कीडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान शासनाने कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविला होता. शासनाने कीडरोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. मात्र सहा महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांची पायपीट सुरू आहे.
तालुक्यात मागील वर्षी झालेल्या गारपीट व मावा तुडतुडा या कीडरोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शासनाने प्रत्येक तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचा अहवाल पाठविण्याचे निर्देश तहसील कार्यालयाला दिले. गोरेगाव तहसील कार्यालयाने याचा अहवाल शासनाकडे पाठविला. मात्र याला सहा महिन्याचा कालावधी लोटूनही ३ हजार ८८० दुष्काळग्रस्त व १६३५ गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तालुक्यात एकूण १९ हजार ८५२ दुष्काळग्रस्त लाभार्थी आहेत. यासाठी तहसील कार्यालयाला ७२ लाख १६ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी १५ हजार ९७२ लाभार्थ्यांना सहा कोटी ३८ लाख ९९ हजार ४८४ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता करण्यात आला. मात्र अद्यापही ३ हजार ८८० लाभार्थी शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत असून त्यांना १ कोटी ३३ लाख १६ हजार ५१६ रुपये मिळणे बाकी आहे. तर गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी १ कोटी ८३ लाख १६ हजार ८८२ निधी प्राप्त झाला. यातील चार हजार ३३४ लाभार्थ्यांपैकी केवळ २ हजार ६९९ लाभार्थ्यांना १ कोटी १३ लाख ९१ हजार ६०४ वाटप करण्यात आल. तर १६३५ लाभार्थ्यांना ६ कोटी ९२ लाख ५ हजार २७८ एवढ्या रक्कमेचे वाटप होणे बाकी आहे. तर मावा तुळतुडा या कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गोरेगाव तहसील कार्यालयाला २४ व २५ मे रोजी ३ कोटी ६३ लाख ६५ हजार ८५६ रुपये प्राप्त झाले.
नुकसान भरपाईसाठी १५ हजार ७४० शेतकरी पात्र ठरले होते. त्यातील १२ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित ३ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांची तहसील कार्यालय आणि बँकामध्ये पायपीट सुरू आहे.

शेतकरी लाभार्थ्यांनी चुकीचे बँक खाते क्रमांक व काही लाभार्थ्यांच्या खात्यात त्रुट्या असल्यामुळे पैसे जमा करण्यास अडचण होत आहे. लवकरच त्रृट्या दूर करुन लाभ देण्यात येईल.
-अरविंद हिंगे,
तहसीलदार, गोरेगाव

Web Title: Farmers' Footpath for Compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.