शेतकºयांची एसडीओ कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 09:08 PM2017-09-07T21:08:00+5:302017-09-07T21:11:53+5:30

Farmers hit the SDO office | शेतकºयांची एसडीओ कार्यालयावर धडक

शेतकºयांची एसडीओ कार्यालयावर धडक

Next
ठळक मुद्देदुष्काळ जाहीर करुन सरसकट कर्जमाफीची मागणी : मुख्यमंत्र्यांच्या नावे दिले निवेदनप्रमुख मागण्यादेवरी तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषीत कराशेतकºयांचा सातबारा कोरा करुन पीक कर्ज व शेती अवजाराचे कर्ज माफ करा.खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील ६८ गावांच्या शेतकºयांना पिकांची नुकसान भरपाई व पिक विमा दावेची रक्कम त्वरित देण्यात यावी.जनावरांसाठी चाºयाची व्यवस्था करण्यात यावी.प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला प्रती युनिट मागे १५ किलो अन्नधान्य देण्यात यावे.कर्जमाफी व पिक विम्याचे आॅफ लाईन अर्ज मंजूर करण्यात यावे.

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना आर्थिक मदत व सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीला घेऊन देवरी तालुक्यातील हजारो शेतकºयांनी गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकºयांच्या या विराट मोर्चाने पोलिसांसह प्रशासनाला चांगलाचा घाम फोडला होता.
कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेच्या नेतृत्वात हा मोर्चा नव्हता तर सर्व शेतकºयांनीच या मोर्चाचे नेतृत्त्व केले हे विशेष. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, पीक विम्याची रक्कम योग्य लाभार्थ्यांना मिळालीच पाहिजे, विमा कंपन्याकडून होणारी शेतकºयांची आर्थिक पिळवणूक बंद करा, मनरेगाची कामे त्वरीत सुरू करा, अशा घोषणा देत परसटोला देवरी येथून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा उपविभागीय कार्यालयाजवळ पोहचला. त्यानंतर देवरी तालुका शेतकरी व शेतमजूर संघटना व शेतकºयांच्या शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे उपविभागीय अधिकारी अशोक लटारे यांना दिले.शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रभान सोनबोईर, संघटक रियाज खान, सचिव महेंद्र मोहबंशी, सहसंघटक जीवनलाल सलामे, दिलीप अंबरवाडे, उत्तम मरकार, रामेश्वर पदाम, रंजित कसाम यांचा समावेश होता.
या वेळी देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवडे, उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तहसीलदार विजय बोरुडे उपस्थित होते. देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हजारोंच्या संख्येत शेतकरी व शेतमजुरांनी काढलेल्या या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी तर नव्हेतच पण कोणत्याही पक्षाचे पोस्टर, बॅनर सुद्धा नव्हते हे विशेष. मोर्चा यशस्वी करण्यासाठी पुनाराम तुलावी, धन्नुलाल उके, कोमल रणबाकडा, लखन दुधकावरा, प्रल्हाद दुधनाग, अनिल वालद, धनसिंग उईके, मंदू बाकचोरिया, दिलीप सोनझाड, गणेश सोनबोईर, बाबुराव हिडको, अमरदास सोनबोईर, इमला बाळाबाग, रामजी हिरवाणी, दिलीप पडोले, लक्ष्मीशंकर मळकाम, पाटणकर, चिंता मडावी यांनी सहकार्य केले.

आमदारांनी घेतली दखल
तालुक्यातील शेतकºयांनी काढलेल्या मोर्चाची आमदार संजय पुराम यांनी दखल घेतली. शेतकºयांच्या मागण्यांची दखल घेत त्या मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.

क्षणचित्रे
तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकºयांचा समावेश
दोनशेहून अधिक ट्रॅक्टरसह शेतकºयांचा सहभाग
स्वंयस्फूर्तपणे शेतकºयांचा सहभाग
शेतकºयांनीच केले नेतृत्त्व
कुठलेही बॅनर, फलक नाही




 

Web Title: Farmers hit the SDO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.