किसान मानधन योजना शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 09:41 PM2019-09-02T21:41:08+5:302019-09-02T21:42:07+5:30
अध्यक्षस्थानी सरपंच नामदेव शहारे होते. उद्घाटन तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक पि.व्ही. कलेवार, तलाठी डी.बी. बोरकर, माजी पोलीस पाटील यादोराव ढोमणे, तंमुस अध्यक्ष हंसराज लिल्हारे, ज्ञानेश्वर राऊत, कृषी सहायक बी.के. दमाहे, कृषी मित्र डुलेश्वर कुंभलवार, गुणेश मस्करे, कार्यालयातील समस्त कृषी सहायक व आत्माचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्तवतीने तालुकास्तरीय किसान मानधन योजना शिबिराचे आयोजन गुरूवारी (दि.२९) ग्राम ढाकणी येथे करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी सरपंच नामदेव शहारे होते. उद्घाटन तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक पि.व्ही. कलेवार, तलाठी डी.बी. बोरकर, माजी पोलीस पाटील यादोराव ढोमणे, तंमुस अध्यक्ष हंसराज लिल्हारे, ज्ञानेश्वर राऊत, कृषी सहायक बी.के. दमाहे, कृषी मित्र डुलेश्वर कुंभलवार, गुणेश मस्करे, कार्यालयातील समस्त कृषी सहायक व आत्माचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
तुमडाम यांनी, प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. १८ ते ४० वयोगटातील अल्प व मध्यम भूधारक शेतकºयांनी पी.एम. किसान योजनेत सहभाग नोंदवावा अशी माहिती दिली. त्यासोबतच कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनाची माहिती शेतकऱ्यांना दिली.
दरम्यान, लाभार्थी शेतकºयांना पाहुण्यांच्या हस्ते किसान पेन्शन कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात कठाने, नेवारे, यादव, दांडगे, सूर्यवंशी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व कॉमन सर्विस सेंटरचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक कलेवार यांनी मांडले. आभार कृषी सहायक भावेश दमाहे यांनी मानले.