रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:43+5:302021-05-25T04:32:43+5:30
धनराज तुरकर यांची गावापासून दाेन किलोमीटर अंतरावर शेती आहे. शेतात रब्बी धानाची कापणी सुरू असल्याने ते सोमवारी (दि.२४) सकाळी ...
धनराज तुरकर यांची गावापासून दाेन किलोमीटर अंतरावर शेती आहे. शेतात रब्बी धानाची कापणी सुरू असल्याने ते सोमवारी (दि.२४) सकाळी ८ वाजता शेतात गेले होते. शेतातून दुपारी १ वाजता दरम्यान घरी पायी परत जात असताना त्यांच्यावर रानडुकराने हल्ला करून पोट व पायावर हल्ला करून गंभीर जखमी केले. जबर हल्ल्याने वृद्ध धनराज यांचा जागीच मृत्यू झाला. तिरोडा वनविभागाला माजी सरंपच रमेश पटले यांनी माहिती दिली असता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दवनिवाडा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक उरकुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार देवराम खंडाते व कल्पेश चव्हाण तपास करीत आहे. धनराज तुरकर त्यांच्या कुटुंबात मुलगा असून सर्व जबाबदारी मुलावर आल्याने वनविभागाने धनराज तुरकर यांच्या मृत्यूमुळे तत्काळ मदत द्यावी अशी मागणी गावातील नागरिक व कुटुंबाने केली आहे.