बोगस बियाण्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 05:57 PM2023-10-16T17:57:05+5:302023-10-16T17:57:26+5:30

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील गौरीशंकर दहीकर हे प्रगतिशील शेतकरी असून, दरवर्षी ते आपल्या बोरगाव येथील शेतीत दोन लक्ष रुपयांचे उत्पन्न घेतात.

Farmers lose about two lakh rupees due to use of bogus seeds | बोगस बियाण्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान 

बोगस बियाण्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान 

गोंदिया जिल्ह्याचा सर्वाधिक धानाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, देवरी तालुक्यात या भाताच्या आगारातही आता बोगस बियाणांचा सुळसुळाट झाले असल्याचे दिसून येते. तालुक्यातील बोरगाव येथील शेतकऱ्याने वर्षी सीड्स कंपनीचे शिवाजी तांदळाचे वाण शेतात पेरले. मात्र, शिवाजी वाणाचे भात पिक न येता खबरा धान उगवल्याने कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्याने कंपनीविरुद्ध कृषी विभागात तक्रार दाखल केली आहे. तसेच बियाणे कंपनीविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे. 

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील गौरीशंकर दहीकर हे प्रगतिशील शेतकरी असून, दरवर्षी ते आपल्या बोरगाव येथील शेतीत दोन लक्ष रुपयांचे उत्पन्न घेतात. यावर्षी त्यांनी वर्षी सीड्स कंपनी तेलंगणाचे शिवाजी नावाचे धान पिकाचे 150 किलो वाण कृषी केंद्रातून खरेदी करुन चार एकर शेतात रोवणी केली. वेळेवर धानाला खत, पाणी व औषध फवारणी केली. त्यानुसार धानाची जोरदार वाढ होऊन धानाची चांगली वाढ झाली. मात्र, जेव्हा धानाच्या लोंबा यायला लागल्या तेव्हा शिवाजी प्रजातीचे धान निघण्याऐवजी खबरा पांढरे लोंब बाहेर आली. हे बघून आजूबाजूचे शेतकरी आश्चर्यचकित झाले. जवळपास 90 टक्के खबरा असल्याने या कंपनीने यात घोळ केला असल्याचा आरोप केला आहे. बोगस बियाणे शेतकऱ्याला पुरवठा केल्याने दहीकर यांचे जवळपास दोन लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या विषयी आता शेतकरी कंपनी विरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तेलंगणा राज्यातील या बियाणे कंपनीला महाराष्ट्र सरकारने बंदी घालावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहे.

Web Title: Farmers lose about two lakh rupees due to use of bogus seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी