शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळायलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 09:52 PM2018-06-11T21:52:54+5:302018-06-11T21:52:54+5:30

सद्यस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेत शेतकऱ्यांना सन्मान मिळत नसल्याचे सांगून सातबारा मिळण्यास तलाठयांकडून अडचण असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. तर काही बँका शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी नोटीसा पाठवित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवरच पिककर्ज मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.

Farmers must get timely credit | शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळायलाच हवे

शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळायलाच हवे

Next
ठळक मुद्देविजय रहांगडाले : पीक कर्ज वाटप मेळावा थाटात

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : सद्यस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेत शेतकऱ्यांना सन्मान मिळत नसल्याचे सांगून सातबारा मिळण्यास तलाठयांकडून अडचण असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. तर काही बँका शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी नोटीसा पाठवित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवरच पिककर्ज मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.
येथे आयोजीत तालुकास्तरीय पीक कर्ज वाटप मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे, तहसीलदार संजय रामटेके, जि.प.सदस्य सुनिता मडावी, विणा बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, सदस्य पटले, सरपंच तुमेश्वरी बघेले, पं.स.सभापती निता रहांगडाले, सदस्य रमणिक सोयाम, जि.प.सदस्य मनोज डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री बडोले यांनी, आजपर्यंत जिल्ह्यामध्ये ५५ कोटी रुपयांचे कर्ज शेतकºयांना वाटण्यात आले आहे. जिल्ह्यातील १० हजार ७१९ शेतकºयांना ३५ कोटी रुपयांची कर्जमाफी झालेली आहे. धानाचे बोनस शेतकºयांना देण्यात आले असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी चालू असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक तहसीलदार संजय रामटेके यांनी केले. संचालन डॉ. प्रकाश गंगापारी यांनी केले. आभार कृषी सेवक खंडाईत यांनी मानले. कार्यक्रमासाठी महसूल विभाग, कृषी विभाग व बँक कर्मचाºयांनी सहकार्य केले.
पीक विमा सक्तीचा नको
या मेळाव्यात सरपंच कमलेश आतिलकर यांनी, पीक विमा सक्तीचा न करता ऐच्छिक करावा अशी मागणी करताच शेतकऱ्यांनी प्रचंड टाळ्या वाजवून दाद दिली. यावर नामदार बडोले यांनी, ही पीक विमा योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची असून ती शेतकºयांच्या फायद्याचीच आहे. तरीही शेतकऱ्यांची ईच्छा व मागणी असल्यामुळे ही बाब मुख्यमंत्र्यांकडे प्रामुख्याने ठेवणार असल्याचे सांगीतले.

Web Title: Farmers must get timely credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.