प्रहार उचलणार शेतकऱ्यांच्या समस्या

By admin | Published: July 31, 2015 02:01 AM2015-07-31T02:01:13+5:302015-07-31T02:01:13+5:30

प्रहार संघटनेची सभा जि.प. कार्यालयाच्या पटांगणावर झाली. अध्यक्षस्थानी संघटनेचे वर्धा जि.प. अध्यक्ष गजानन कुबळे होते.

Farmers' problem to pick up the poke | प्रहार उचलणार शेतकऱ्यांच्या समस्या

प्रहार उचलणार शेतकऱ्यांच्या समस्या

Next

गोंदिया : प्रहार संघटनेची सभा जि.प. कार्यालयाच्या पटांगणावर झाली. अध्यक्षस्थानी संघटनेचे वर्धा जि.प. अध्यक्ष गजानन कुबळे होते. अतिथी म्हणून पप्पू देशमुख, फिरोजखान पठान, राजेश पाखमोडे उपस्थित होते. यात शेतकऱ्यांच्या समस्या प्रहार संघटना उचलून धरणार, असे ठरविण्यात आले.
या वेळी बच्चू कडू यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे सर्वेक्षण करून प्रमोद गजभिये यांची गोंदिया जिल्हा प्रहार संघटनेच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना घेवून २१ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणी ते कापणीपर्यंतची मजुरी रोजगार हमी योजनेतून शासनाने द्यावी, जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यास या योजनेचा लाभ द्यावा, राष्ट्रीय फळबाग योजनेंतर्गत पेरणी ते कापणीपर्यंतची मजुरी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळते, याच धर्तीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा, सर्व विधवा महिलांना शासनाच्या सर्व योजनेचे लाभ द्यावे, अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना त्यांनी काढलेल्या जनिनीचे पट्टे कोणतीही अट लागू न करता द्यावे आदी अनेक मागण्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी पिंटू ठाकूर, निक्कू नायक, राजेश कार्नर, गणेश लांजेवार, कमलेश उके, रुपदास मेश्राम, नेता रहांगडाले, छोटू भालाधरे, हिवराज सयाम, सिध्दार्थ शेंडे, चंद्रशेखर बैस, शेखर मारवाडे, सन्नी यादव, रोशन यादव, सन्नी ठाकूर, बंटी बैस, किशोर भोयर, अमीन श्रीवास्तव, विक्की थापा, विक्रांत ठाकूर, झामा चौरीवार, प्रमोद तिराले, रिना भेंडारकर, बबिता गजभिये, अर्चना जुनेदार, रावते, रिझवाना शेख, योगेश सव्वालाखे, सोनू उके उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers' problem to pick up the poke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.