हक्काच्या कनेक्शनसाठी शेतकऱ्यांची धाव

By admin | Published: April 18, 2016 04:08 AM2016-04-18T04:08:04+5:302016-04-18T04:08:04+5:30

शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून पंप चालविले जातात. मात्र हे पंप आता आपल्या स्वत:च्या कनेक्शनवरून

Farmer's run for the connection of the claim | हक्काच्या कनेक्शनसाठी शेतकऱ्यांची धाव

हक्काच्या कनेक्शनसाठी शेतकऱ्यांची धाव

Next

कपिल केकत ल्ल गोंदिया
शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून पंप चालविले जातात. मात्र हे पंप आता आपल्या स्वत:च्या कनेक्शनवरून चालविण्याप्रती शेतकरी जागरूक झाला असून कृषी पंप कनेक्शनसाठी शेतकरी धाव घेत आहेत. हेच कारण आहे की, वीज वितरण कंपनीकडे कृषीपंपांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. यंदा मार्च पर्यंत वीज कंपनीने जिल्ह्यात ३६४१ कनेक्शन केले आहेत.
वीज चोरीच्या प्रकारात जिल्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत नेहमीच राहतो. वीज चोरीच्या या प्रकारांमुळे वरिष्ठांकडून जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. परिणामी जिल्हास्तरावर मोहिम छेडून वीजचोरांवर कारवाई केली जाते. अशात जे शेतकरी अवैधरित्या वीज घेऊन पंप चालवितात त्यांच्यावरही गाज पडते व मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागतो. एकंदर फायद्यासाठी केलेले काम तोट्यात जाते.
आपल्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्याला कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्यात यावे यासाठी शासन ही प्रयत्नशील असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनही राबविल्या जात आहेत.
त्यामुळे वीज चोरीचा प्रकार टाळून स्वत:चे हक्काचे कनेक्शन घेऊनच आपला पंप चालवावा एवढी जागरूकता आता शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.
परिणामी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करीत आहेत.
यंदा मार्च २०१६ पर्यंत वीत वितरण कंपनीने जिल्ह्यात ३६४१ शेतकऱ्यांना कृषी पंप कनेक्शन दिले आहेत. या कामगिरीवरून जिल्हा कृषी पंप जोडणीत राज्यात अव्वल देखील ठरला आहे हे विशेष. तर शेतकऱ्यांची ही जागरूकता बघता वीज वितरण कंपनीकडूनही निधीच्या उपलब्धेनुसार शेतकऱ्यांच्या या अर्जांवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे.

पाच हजार कनेक्शनचे नियोजन
४कृषी पंप जोडणीसाठी शेतकऱ्यांना जास्त काळ वाट बघावी लागू नये यासाठी वीज कंपनीकडून नेहमीच कार्य केले जात आहे. त्यात आता यंदा पाच हजार कनेक्शनसाठीचे नियोजन केले जात असल्याचे अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण यांनी सांगीतले. यासाठी निधी उपलब्ध होताच काम सुरू केले जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगीतले.

वीज कंपनीकडे २२०७ पेड पेंडिंग
४वीज कंपनीने ३६४१ शेतकऱ्यांना मार्च पर्यंत कनेक्शन दिले असले तरिही अर्जांची संख्या काही कमी झाली नसून आजही कंपनीकडे २२०७ पेड पेंडिंग (डिमांड भरलेले) अर्ज आहेत. तर येत्या एप्रिल ते मार्च या कालावधीत आणखी सुमारे तीन हजार अर्ज येण्याची शक्यताही अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Farmer's run for the connection of the claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.