शेतकरीपुत्र सूरज ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:21+5:302021-07-14T04:34:21+5:30

संताेष बुकावन अर्जुनी मोरगाव : शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सूरज संतोष उके याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्राणिशास्त्र ...

Farmer's son Suraj became the gold medalist | शेतकरीपुत्र सूरज ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

शेतकरीपुत्र सूरज ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

Next

संताेष बुकावन

अर्जुनी मोरगाव : शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सूरज संतोष उके याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्राणिशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून द्वितीय क्रमांक पटकावला. सोमवारी (दि. १२) नागपूर विद्यापीठाच्या १०८ व्या दीक्षान्त समारंभात त्याला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पिंपळगाव खांबीसारख्या छोट्याशा गावात राहणारे सूरजचे वडील संतोष व आई सविता यांनी लहानपणापासूनच त्याच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले. निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असलेल्या शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात समाधान मानत सूरज खूप मोठा व्हावा, त्याने चांगले शिक्षण घ्यावे, असे स्वप्न त्याच्या आई-वडिलांनी पाहिले होते. सूरजने शासकीय विज्ञान संस्था, नागपूर येथून प्राणिशास्त्र विषयात एम. एस‌्सी. केले आहे. चारही सत्रांमध्ये महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान त्याने पटकाविला. त्याला एम.एस‌्सी.मध्ये ८५.४३ टक्के गुण मिळाले. सोमवारी झालेल्या १०८ व्या दीक्षान्त समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे उपस्थित होते. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शासकीय विज्ञान संस्थेच्या प्राणिशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व संस्थेच्या प्रमुखांना दिले आहे. त्याने बी. एस्सी.पर्यंतचे शिक्षण अर्जुनी मोरगाव येथील एस.एस.जे. महाविद्यालयातून पूर्ण केले. तो २०१५ चा अवाॅर्ड अँड अचीव्हमेंट इन्स्पायर शिष्यवृत्तिधारक आहे. त्याने आपले बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण शिष्यवृत्तीतून पूर्ण केले आहे.

.........

शिष्यवृत्तीतून पूर्ण केले शिक्षण

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने मिळविलेले हे यश येथेच थांबणार नसून, आपला वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक बळकट करण्याचे त्याने ठरविले आहे. विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी इन्स्पायर नावाची शिष्यवृत्ती आहे. याची बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे बौद्धिक क्षमता असतानाही केवळ पैशाअभावी विद्यार्थी करिअर घडवू शकत नाहीत. या प्रकारची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सूरजने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

130721\img-20210713-wa0010.jpg

नागपूर विद्यापीठाच्या १०८ व्या दीक्षांत समारंभात सुरजला सुवर्णपदक देऊन सन्मानित करतांना मान्यवर

Web Title: Farmer's son Suraj became the gold medalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.