सिंचनासाठी शेतकऱ्यांचे इटियाडोह धरणावर साखळी उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 05:00 AM2022-01-01T05:00:00+5:302022-01-01T05:00:08+5:30
इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत. मागील काही वर्षांपासून धरणाच्या सिंचनाला घेऊन रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या रोटेशन पद्धतीमुळे तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : रब्बी हंगामाच्या धान पिकासाठी इटियाडोह धरणाचे पाणी देण्यात यावे, या मागणीला घेऊन धरण परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी धरणाच्या गेटसमोर शुक्रवारपासून (दि.३१) तीन दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत. मागील काही वर्षांपासून धरणाच्या सिंचनाला घेऊन रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या रोटेशन पद्धतीमुळे तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती आहे. रोटेशन पद्धत हा पाणी वापर संस्थांचा एकप्रकारचा जावईशोधच आहे. यावर्षी रब्बी हंगामाला तालुका सोडून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीपर्यंत पाणी देण्यात येणार, असे पाणीवाटप संस्थांनी ठरविले. यामुळे धरण परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहणार आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. धरण परिसरातील शेतकऱ्यांचा धरणाच्या पाण्यावर प्रथम अधिकार आहे. रब्बी हंगामाला धरणाचे पाणी द्या या मागणीसाठी परिसरातील शेकडो शेतकरी धरणाच्या गेटसमोर शुक्रवारपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. हे साखळी उपोषण तीन दिवस चालणार आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यास या उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होईल, अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे. प्रशासनाने या प्रश्नावर त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
यावेळी रतिराम राणे, यशवंत परशुरामकर, यशवंत गणवीर, दीनदयाल डोंगरवार, संजय ईश्वार, राजहंस ढोके, नारायण हटवार, विनोद किरसान, राधेश्याम साखरे, राजकुमार तुलावी, जागेश्वर भोगारे, धनराज हर्षे, गुलाब भोयर, आनंदराव तिरगम, भिवा मलगाम, मधू गहाणे, योगराज हलमारे, त्र्यंबक झोळे, प्रमोद डोंगरवार, मनोहर बडवाईक, हेमंत देशमुख, संजू देशमुख, शिगू कोवे, हेमराज नाईक, प्रभू नंदनवार, शिवलाल वाघमारे, मोहन दानी, भाष्कर दखने, सोमा नरवास, रूपलाल गहाणे, प्रेमलाल करंडे, दीपक राणे, विनोद किरसान, तुलसीदास कोडापे, यशवंत भोयर, निलकंठ हटवार, विष्णू सिकदार, दीपक चक्रवर्ती आणि शेतकरी उपस्थित होते.