शेतकरी समृद्ध होईल

By admin | Published: May 28, 2017 12:10 AM2017-05-28T00:10:13+5:302017-05-28T00:10:13+5:30

मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे.

Farmers will be rich | शेतकरी समृद्ध होईल

शेतकरी समृद्ध होईल

Next

पालकमंत्री बडोले : सलंगटोला येथे शिवार संवाद सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ११ हजार ९५ कोटी रूपयांची राज्यातील शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मदत करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेतून अपुर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. शेतीशी संबंधित असलेल्या विविध योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना देवून त्यांना समृध्द करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सालेकसा तालुक्यातील सलंगटोला येथे २६ मे रोजी आयोजित शिवार संवाद सभेत उपस्थित शेतकऱ्यांना अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. संजय पुराम, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, माजी जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता पुराम, माजी पं.स.सभापती बाबुलाल उपराडे, माजी पं.स.सदस्य संगीता शहारे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बहेकार उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, राज्य शासन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील १ कोटी ३१ लाखशेतकऱ्यांची कर्जफेड शासनाने केली आहे. उर्वरीत ३१ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना पिक विम्याचे ६७३९ कोटी रूपये दिले आहे. २०१९ पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यात येत आहे. शाश्वत सिंचनासाठी हे अभियान उपयुक्त ठरत आहे. या अभियानातून ५४४ कोटीची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे. १२ लाख ५१ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रासाठी एकवेळच्या संरक्षीत सिंचनाची सुविधा यातून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
आपला तलावांचा जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ खत म्हणून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. यावर्षी ४०० तलावांचा गाळ काढण्यात येत असून येत्या तीन वर्षात सर्वच १८०० तलावातील गाळ काढण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या पाणी साठ्यामुळे २५ टक्के सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात युरियाचा काळाबाजार होणार नाही, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी देण्यात येईल. शेती प्रकृतीची तपासणी करण्यासाठी माती परीक्षण करण्यात येत आहे. धान खरेदी केंद्रावर धान सडणार नाही, १०० एकर शेतीमध्ये गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक मदत करणार आहे.
आ. पुराम म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्याय विविध योजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत आहे की नाही, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, धडक सिंचन विहिरीचा कार्यक्र म, घरकूल योजना, वीज कनेक्शन यासह अनेक बाबींवर शासनाने काम केल्याचे सांगितले.
तालुक्यातील १३ दुष्काळग्रस्त गावांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याची बाब उपस्थित शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. गाव परिसरात एका माकडाच्या उपद्रवामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त असून काही लोकांना या माकडाने चावा घेतल्यामुळे माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्यावर पालकमंत्र्यांनी उपवनसंरक्षकांना ही माहिती भ्रमणध्वनीवरु न देवून त्या उपद्रवी माकडाला ताबडतोब पकडण्याचे निर्देश दिले. मोतीराम भांडारकर या शेतकऱ्याचे १० एकर शेतीतील धान कुणीतरी अज्ञान व्यक्तीने पेटवून दिल्यामुळे शासनाने त्या व्यक्तीस त्वरीत मदत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून दिल्या. सलंगटोला येथे आयोजित शिवार संवाद सभेला गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Web Title: Farmers will be rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.