२६ हजारांवर शेतकरी कर्जमाफीस मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 09:30 PM2017-10-03T21:30:59+5:302017-10-03T21:31:13+5:30

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ७६ हजार ७७० शेतकरी पात्र ठरले. चावडी वाचन आणि अर्जांच्या पडताळणीनंतर यापैकी केवळ ५० हजार ७७० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता आहे.

Farmers will lose their debt of 26 thousand | २६ हजारांवर शेतकरी कर्जमाफीस मुकणार

२६ हजारांवर शेतकरी कर्जमाफीस मुकणार

Next
ठळक मुद्दे७६ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र : किचकट प्रक्रियेचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ७६ हजार ७७० शेतकरी पात्र ठरले. चावडी वाचन आणि अर्जांच्या पडताळणीनंतर यापैकी केवळ ५० हजार ७७० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे २६ हजारावर शेतकरी कर्जमाफीस मुकण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे. जिल्ह्यात एकूण अडीच लाख शेतकरी असून यापैकी ७६ हजार ७७० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले होते. या शेतकºयांकडे एकूण २६५ कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक आहे. कर्जमाफी योजनेतंर्गत हे कर्जमाफ केले जाणार आहे. यासाठी शासनाने काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत. जे शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले त्यांच्याकडून शासनाने आॅनलाईन अर्ज मागविले होते. या अर्जांची पडताळणी चावडी वाचन करुन केली जाणार आहे. पडताळणीपैकी एकूण अर्जांपैकी २६ हजारावर अर्ज रद्द होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. बºयाच अर्जामध्ये त्रृट्या आहेत, तर काही शेतकरी शासनाने लागू केलेल्या अटी शर्तीमुळे अपात्र ठरण्याची शक्यता आहे. एकंदरीत जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण ७६ हजार ७७० शेतकºयांपैकी अखेर ५० हजार ७७० शेतकºयांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याला जिल्हा प्रशासनाने देखील दुजोरा दिला आहे.
अधिकारी कर्मचाºयांची सावध भूमिका
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी चावडी वाचन घेऊन केली जात आहे. यामुळे बºयाच नावावर आक्षेप घेतले जात आहे. परिणामी ते अर्ज रद्द करण्याची वेळ कर्मचाºयांवर येत आहे. त्यामुळे शेतकºयांचा रोष ओढवून घेण्याची वेळ अधिकारी व कर्मचाºयांवर येत असल्याने काही कर्मचारी चावडी वाचन कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार देत असल्याची माहिती आहे.
डिसेंबरपूर्वी कर्जमाफी अशक्यच
जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या १६ आॅक्टोबरला होऊ घातली आहे. त्यामुळे आचार संहिता लागू असून त्या गावांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम घेता येत नाही. त्यामुळे चावडी वाचनाचा कार्यक्रम महिनाभर लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. परिणामी कर्जमाफीची पुढील प्रक्रिया लांबणार असल्याने डिसेंबरपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे.
पीक कर्ज वाटपाचे टार्गेट वाढणार
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना पुढीेल खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बँकाचे पीक कर्ज वाटपाचे टार्गेट २५० कोटी रुपयांनी वाढणार आहे.

Web Title: Farmers will lose their debt of 26 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.