शेतकऱ्यांना शेती विषय मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 08:24 PM2019-05-04T20:24:44+5:302019-05-04T20:25:41+5:30

पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसेप) सलग्न शेतकरी शेतीशाळा (एफएफएस) तालुकास्तरीय कार्यशाळा ३० एप्रिल रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्यावतीने अदानी फाऊंडेशनच्या शेतकरी सभागृहात घेण्यात आली.

Farming guidance for farmers | शेतकऱ्यांना शेती विषय मार्गदर्शन

शेतकऱ्यांना शेती विषय मार्गदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । शेतकरी शेतीशाळा कार्यक्रम : शेतकऱ्यांना दिल्या टिप्स

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसेप) सलग्न शेतकरीशेतीशाळा (एफएफएस) तालुकास्तरीय कार्यशाळा ३० एप्रिल रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्यावतीने अदानी फाऊंडेशनच्या शेतकरी सभागृहात घेण्यात आली. सदर तालुकास्तरीय कार्यशाळेला तालुक्यातील आत्मा अंतर्गत कृषिमित्र व माहीमच्या कृषि सखी, प्रगतशिल शेतकरी व कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटन अदाणी फाऊंडेशनचे सी.एस.आर. प्रमुख नितीन शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांच्या मार्फत करण्यात आले होते. यावेळी माती परिक्षणाचे महत्व, पूर्व मशागतीचे फायदे, योग्य वाणाची निवड व त्यासाठीचे निकष, उगवनक्षमतेचे महत्व, बिज प्रक्रियेचे महत्व, हिरवळीच्या खतांचे महत्व, भात लागवडीकरिता नर्सरी कशी तयार करावी व त्याचे महत्व, रोपांची निगा व किती दिवसांची रोपे लागवड करावी, रोवताना दोन रोपातील अंतर, रासायनिक खतांची मात्रा तसेच युरिया बिक्रेटचा वापर, कोनोविडरच्या सहाय्याने तणनियंत्रण, पाणी व्यवस्थापन, सेंद्रीय शेती, शत्रू व मित्र किडींची ओळख व मित्र किडींचे महत्व, किड व रोगांची माहिती व व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक उपाय, भात पिकाची परीपक्वता ओळखून कापणी-मळणी कशी करावी व त्याचे निकष तसेच विक्री व्यवस्थापनाबाबत माहिती याविषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शेतीशाळेला उपस्थित शेतकºयांचे खोडकिडा, गादमाशीे, ढालकिडा, क्रायसोपा असे चार गट तयार करुन प्रत्येक गटाकडून प्रात्यक्षिक कृतीतून निरीक्षण नोंद घेवून प्रेझेंटेशन करण्यात आले. यादरम्यान उपस्थित गटातील सदस्यांकडून प्रश्न करुन उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच अमृत पाणी जिवामृत, दर्शपर्णी अर्क, गांडूळखत, हिरवळीचे खत, एसआरई पद्धत, मृत नमूने तपासणी, किड व रोग किडीचे जिवनक्रम व नियंत्रण उपाय योजना, फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतीशाळेत समाविष्ट गटांमार्फत सांघीक खेळ घेवून त्यांचे महत्व पटवून देण्यात आले. संचालन कृषी सहायक के.जे. सलामे यांनी केले. आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एस.आर. पुस्तोडे यांनी मानले.

Web Title: Farming guidance for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.