आमगाव खुर्दच्या महिलांचे साखळी उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:00 AM2018-03-07T01:00:41+5:302018-03-07T01:00:41+5:30

The fast to the chaos of women of Aamgaon Khurd continued | आमगाव खुर्दच्या महिलांचे साखळी उपोषण सुरूच

आमगाव खुर्दच्या महिलांचे साखळी उपोषण सुरूच

Next
ठळक मुद्देसातवा दिवस : नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्यासाठी संघर्ष तीव्र

ऑनलाईन लोकमत
सालेकसा : आमगाव खुर्द ग्रामपंचायतचा सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीला घेऊन आमगाव खुर्द वासीयांनी २७ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाला आठवडाभराचा कालावधी लोटूनही शासनाने अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकºयांमध्ये रोष व्याप्त आहे मंगळवारपासून (दि.६) आमगाव खुर्द येथील महिलांनी उपोषणात सहभाग घेतला. मंगळवारचा दिवस महिलांच्या उपोषणाने गाजला. त्यांचा आवाज शासनाच्या कानावर केव्हा जाईल आणि कधी आदेश मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमगाव खुर्दच्या हद्दीत सालेकसा तालुक्याची सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व बाजारपेठ आहे. तालुक्याच्या मुख्यालयाचा विस्तार याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत झाला. त्यामुळे संंपूर्ण परिसर नागरी रचनेत मोडत असून सुध्दा आमगाव खुर्दला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे आमगाव खुर्दवासी मागील तीन वर्षांपासून सतत मागणी करीत आहेत. संघर्ष करुन सुध्दा शासनाने याबाबत कुठलीच भूमिका घेतली नाही.
एवढेच नव्हे तर स्थानिक लोकप्रतिनिधी सुध्दा यासाठी सकारात्मक बाजू मांडून सहकार्य करीत नसल्याचा आरोप आमगाव खुर्दवासीयांनी केला आहे. अशात आता उपोषण आंदोलना शिवाय दुसरा मार्ग नसल्याने गावकºयांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
यात काही लोकांचा अपवाद वगळता सर्व राजकीय पक्ष आणि सर्व गावकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. गावातील महिला आता पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून या आंदोलनात आपले संपूर्ण योगदान देत आहेत.
साखळी उपोषणात सहभागी झालेल्या महिलांमध्ये रीता दोनोडे, जया डोये, दिपाली बारसे, लक्ष्मी चुटे, वंदना डोये, योगिता बांगळे, शशी फुंडे, मंजू मेंढे, विमल कटरे, कौशल्या कठाणे, वर्षा साखरे, शोभा पाथोडे, अनिता चुटे, ललिता शिवणकर, ममता चुटे, विद्या पाथोडे, शुभांगी डोये, निता वशिष्ठ यासह इतर महिलांचा समावेश आहे.

Web Title: The fast to the chaos of women of Aamgaon Khurd continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.