मागण्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:10 AM2019-01-07T00:10:54+5:302019-01-07T00:11:50+5:30

जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगाना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Fast movement if demands are not met | मागण्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन

मागण्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन

Next
ठळक मुद्देअपंग कल्याणकारी संघटनेचा इशारा : जिल्हाधिकारी व सीईओला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगाना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दिव्यांगाच्या समस्या त्वरीत मार्गी न लावण्यात आल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अपंग कल्याणकारी संघटनेचे कार्याध्यक्ष व सचिव दिनेश पटले यांनी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे व जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
पटले यांच्या नेतृत्त्वात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी व सीईओ यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्याशी चर्चा करुन विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी दिलेल्या निवेदनातून विविध विभागातील दिव्यांगाचा अनुशेष त्वरीत भरण्यात यावा, दिव्यांगाना व्यवसासाठी दोनेश चौरस फूट जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. सर्व नगर परीषद व नगर पंचायतीने दिव्यांग कल्याण ५ टक्के निधी त्वरीत खर्च करावा, स्टँम्प विक्रीचा परवाना, केरोरिसन, रेशन दुकान परवाना दिव्यांगाना देण्यात यावा. ५ टक्के निधीचे योग्य वितरण व नियोजन करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समिती गठित करण्यात यावी, दिव्यांगाना घर टॅक्समध्ये ५० टक्के सवलत द्यावी, घरकुल योजनेत दिव्यांगांना ५ टक्के आरक्षणानुसार लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात आकाश मेश्राम, शामसुंदर बन्सोड, दुर्गेश जावरकर, योगेश लिल्हारे, देवलाल शरणागत, चंद्रशेखर कुंभरे, सहेबाज शेख, राखी चुटे, सविता चौधरी, विनोद शेंडे, सागरलाल बोपचे, राजू बरियेकर, सरिता चिखलोंढे, अशोक रामटेके उपस्थित होते.
 

Web Title: Fast movement if demands are not met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.