६४ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:06 PM2017-12-13T22:06:31+5:302017-12-13T22:06:58+5:30
येथील नगर पंचायतसाठी बुधवारी (दि.१३) मतदान घेण्यात आले. यात एकूण ८९.६५ टक्के मतदान झाले असून नगराध्यक्षपदाचे पाच आणि नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेल्या ५९ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : येथील नगर पंचायतसाठी बुधवारी (दि.१३) मतदान घेण्यात आले. यात एकूण ८९.६५ टक्के मतदान झाले असून नगराध्यक्षपदाचे पाच आणि नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेल्या ५९ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे.
पाच उमेदवारांपैकी नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार आणि ५९ पैकी १७ नगरसेवक कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी (दि.१४ ) सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. नगर पंचायतीच्या एकूण १७ प्रभागात एकूण २४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
पहिला नगराध्यक्ष बनण्याच्या बहुमान अनुसूचित जमातीला मिळणार असून १७ नगरसेवकांपैकी आठ नगरसेवक अनुसूचित जमातीचे राहणार आहेत. यात चार महिला नगरसेवक असतील. अनुसूचित जातीची एकच महिला नगरसेवक बनणार आहे.
नागरिकांंचा मागास प्रवर्गाचे पाच नगरसेवक होणार असून यात तीन महिला आणि दोन पुरुष ओबीसी नगरसेवक बनतील. त्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातून तीन नगरसेवक होणार असून यात दोन पुरुष आणि एक महिना नगरसेवक बनेल. काही ठिकाणी पुरुषांच्या विरुध्द महिलांनी मैदानात उतरल्या त्यामुळे महिला नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरक्षणानुसार १७ पैकी ९ नगरसेवकपद महिलांसाठी राखीव आहेत. नगराध्यक्षपदासाठी तीन पुरुष आणि दोन महिला उमेदवार रिंगणात होते.