बिनधास्तपणे करा वृत्तपत्रांचे वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:26 AM2021-04-26T04:26:28+5:302021-04-26T04:26:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जगात आणि देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जगात आणि देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात वाचकांपर्यंत खरी माहिती पोहचविण्याचे काम वृत्तपत्र चोखपणे बजावित आहे. कोरोना कालावधीत घडणाऱ्या घडामोडींची माहिती सर्वसामान्यांना पोहचवित आहे. ‘लोकमत’ने नेहमीच पारदर्शक पत्रकारितेवर भर दिला आहे. शिवाय वृत्तपत्रांचे वाचन केल्याने कोरोनाचा संसर्ग होतो ही केवळ अफवाच आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि तज्ज्ञांनी सुद्धा वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नसून ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाचकांनी अचूक माहिती मिळविण्यासाठी आणि सोशल मीडियावर खोट्या अफवांपासून दूर राहण्याकरिता मनात कुठलेही किंतु परंतु न ठेवता वृत्तपत्रांचे बिनधास्तपणे वाचन करावे असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
- वृत्तपत्र विक्रेता हा आपल्या समाजाचा एक घटक आहे. आम्ही नियमित वृत्तपत्र वाचतो. वृत्तपत्र वाचताना आम्हीही काळजी घेतो. वृत्तपत्रांमुळे अजूनही कुणाला कोरोना झालेला नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, गर्दी करणे टाळावे. अचूक बातम्यांसाठी सर्वांनी वृत्तपत्र नियमितपणे वाचावे. अत्यावश्यक सेवेमध्ये वृत्तपत्रांचा समावेश केला आहे. वृत्तपत्रामुळे कोरोनाची लागण होत नाही, म्हणून वृत्तपत्राला बंधने सरकारने घातलेली नाहीत. घरोघरी वृत्तपत्र वाचण्याची सवय आता पुन्हा सुरु झाली आहे. वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही.
- विनोद अग्रवाल, आमदार गोंदिया.
.....
वृत्तपत्राचे वितरण आणि वाचन केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतो किंवा होऊ शकतो असे म्हणणे म्हणजे मला अंधश्रद्धाच वाटते. कारण कोरोना व्हायरस वृत्तपत्र-निर्मिती प्रक्रियेच्या दरम्यान तयार होणाऱ्या उष्णतेत टिकूच शकत नाही. हे वैज्ञानिक सत्य वारंवार सांगितले गेले आहे. शिवाय वृत्तपत्र निर्मितीनंतर त्यांच्या प्रारंभिक सॅनिटायझेशनची सुद्धा दक्षता घेण्यात येत असल्याचे वृत्तपत्रांचे चालक विश्वासपूर्वक सांगत आहेत. वृत्तपत्र वाटप करणारे सुद्धा काही वाचकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत नसून वाटपादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. म्हणून वृत्तपत्र आणि कोरोना-संसर्ग असा कार्यकारण संबंध येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे सर्वांनी आपल्या मनातील गैरसमज दूर करुन बिनधास्तपणे वृत्तपत्रे वाचन करावे.
अॅड. लखनसिंह कटरे, साहित्यिक, बोरकन्हार, जि.गोंदिया
.....
जागतिक महामारी ठरलेला कोरोना हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होतो. परंतु वृत्तपत्रांमुळे कोरोनाची लागण झाल्याचे ऐकिवात नाही. माहिती मिळविण्याचे अनेक माध्यम आहेत. परंतु बहुतांश माध्यमातून फेक न्यूजच मिळतात. सत्य व अचूक बातमी वृत्तपत्रांतूनच कळते. लॉकडाऊनच्या काळातही आम्ही नियमित वृत्तपत्र वाचले. खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचविणारे वृत्तपत्र वाचकांनी बिनधास्तपणे नियमित सर्वांनी वाचावे.
-विरेंद्र कटरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.
.........
वर्तमानपत्र दररोज वाचावे. वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही हे सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावरुन फेक बातम्या जास्त येतात. परंतु वृत्तपत्र सत्य बातम्या देण्याचे काम करुन समाजात जनजागृती घडवितात. कोरोनाच्या काळातही सेवा देणारे वृत्तपत्र अत्यावश्यक सेवेत मोडते. खोट्या अफवांवर वाचकांनी विश्वास न ठेवता नियमित आपल्या घरी वर्तमानपत्र बोलावून बिनधास्तपणे वाचन करावे.
- डॉ. भुमेश्वर पटले