देशभक्तीची भावना क्षणिक नाही, ती चिरंतर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:17+5:30

अटलजींनी त्याला ‘जय विज्ञान’ तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जय अनुसंधान’ अशी जोड दिली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान फक्त अधिकारच शिकवत नाही तर कर्तव्य तत्परता सुद्धा शिकविते असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.

The feeling of patriotism is not fleeting, keep it lasting | देशभक्तीची भावना क्षणिक नाही, ती चिरंतर ठेवा

देशभक्तीची भावना क्षणिक नाही, ती चिरंतर ठेवा

Next
ठळक मुद्देविनोद अग्रवाल : ठिकठिकाणी केले ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशभक्तीची भावना ही क्षणीक न ठेवता वर्षभर ही भावना मनात कायम ठेवित भारताच्या विकासाचा विचार पुढे नेण्याची आज नितांत आवश्यकता आहे. लालबहादुर शास्त्रीजीं यांनी ‘जय जवान-जय किसान’ चा नारा दिला. अटलजींनी त्याला ‘जय विज्ञान’ तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जय अनुसंधान’ अशी जोड दिली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान फक्त अधिकारच शिकवत नाही तर कर्तव्य तत्परता सुद्धा शिकविते असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
येथील सेंट झेंवियर्स स्कूल, गोंदिया पब्लिक स्कूल, रेल्वे स्थानक, पोलीस मुख्यालय, पंचायत समिती कॉलनी, चावडी चौक छोटा गोंदिया, संजय नगर, शिव मंदिर चौक, शास्त्री चौक, सावित्रीबाई फुले चौक इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण करून नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आ. अग्रवाल म्हणाले, भारतीय संविधान हा जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून त्याला लोकशाहीमुळे आणखी जास्त बळ मिळाले आहे.लोकशाहीमुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळाला आहे.
प्रत्येक नागरिकाला समान हक्क, सेवा आणि अधिकार संविधानाच्या मार्फत देण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती हा एक भारतीय म्हणून ओळखला जातो. ही ओळख संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला बहाल केली आहे. नागरिकांनी संविधानाचा आदर करीत आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असेही सांगीतले. याप्रसंगी भाऊराव ऊके, राम पुरोहित, हंसराज वासनिक, राजू पटले, सुभाष मुंदडा प्रामुख्याने उपस्थित होते.
 

Web Title: The feeling of patriotism is not fleeting, keep it lasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.