भरकटणाऱ्या पावलांना ‘मैत्री’ने सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:23 AM2018-01-20T00:23:54+5:302018-01-20T00:24:16+5:30

The feet that got lost were saved by 'friendship' | भरकटणाऱ्या पावलांना ‘मैत्री’ने सावरले

भरकटणाऱ्या पावलांना ‘मैत्री’ने सावरले

Next
ठळक मुद्देनऊ महिन्यातील मार्गदर्शन : संवाद केंद्र ठरत आहे उपयोगी

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अर्श कार्यक्रमांतर्गत सुरू ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून संकुचित प्रवृत्तीच्या पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मोकळपणे व्यक्त होण्यास शिकविले जात आहे. बालकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांना वेळेवर शास्त्रीय पद्धतीने समाधान होणे गरजेचे असते. दररोज अनके पाल्यांचे आई-वडील पाल्यांचा समस्या घेऊन जिल्हा रूग्णालयातील ‘मैत्री’ संवाद केंद्रात पोहचून मार्गदर्शन घेत आहेत. ‘मैत्री’ संवाद केंद्रातून मागील नऊ महिन्यात ३ हजार ६२३ मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
शारीरिक बदल होतांना अनेक समस्या येतात. शिक्षक व पालक त्यांच्या विचीत्र वागण्याची तक्रार करीत असतात. परंतु त्या वागण्यात मुला-मुलीची चूक नाही. वाढत्या वयासह शरीरात बदल होत असतात. या बदलाला स्वीकारताना अनेक समस्या येतात. अशा मुला-मुलींना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते बरेचदा ते चुकीच्या मार्गावर जात असतात. ‘मैत्री’ द्वारे १० ते १९ वर्षातील मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. जिल्हा सामान्य रूग्णालयातील ‘मैत्री’संवाद केंद्रात दररोज सुरू असतो. याशिवाय बाई गंगाबाई महिला रूग्णालयात गुरुवार, तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात बुधवार व देवरीच्या ग्रामीण अस्पतालयात शुक्रवारला आठवड्यातून एक दिवस सेवा दिली जाते. ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून मुला-मुलींच्या शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्यासंदर्भात माहिती दिली जाते.
मोफत हिमोग्लोबीन, रक्त व सिकलसेल तपासणी केली जाते. विवाह पूर्वी मार्गदर्शन, आहार विषयक मार्गदर्शन व रक्ताची कमतरता उपचार केला जात आहे.मासिक पाळीतील आजारासंबंधी माहिती दिली जाते. प्रजनन व लैंगिक आजारसंबधी प्रतिबंधक आरोग्य शिक्षण व उपाय योजना केली जाते. ही सर्व माहिती गुप्त ठेवली जाते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ‘मैत्री’ केंद्रात सन २०१७ मध्ये एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत ३ हजार ६२३ मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. एकट्या डिसेंबर महिन्यात ४०० मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
मोबाईल ठरत आहेत घातक
अँड्रॉईड मोबाईलचा सर्वाधिक परिणाम तरुण आणि अल्पवयीन मुलांवर होत आहे. किशोरवयीन मुले- मुली अँड्रॉईड मोबाईल, इंटरनेटचा सर्रास वापर करतात, टी. व्ही. चॅनलवर त्यांनी जे पाहू नये ते पाहतात. त्याचेच अनुकरण करुन अश्लील कृत्य करतात. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. शाळांमध्ये अनेक कृत्य झाल्याचे उदाहरणे पुढे आली आहेत. बालके प्रौढ व्यक्तीसारखा व्यवहार करतात. या स्थितीमुळेलैंगिक शोषणाच्या प्रकरणात वाढ झाली आहे. पौगंडावस्थेतील बालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘मैत्री’ संवाद केंद्राकडून आश्रमशाळा, झोपडपट्टी परिसर, शाळेत मार्गदर्शन केले जाते. बालकांच्या समस्यांना घेऊन काही पालक व शिक्षक ‘संवाद केंद्रात येतात. परंतु मोकळेपणाने बोलत नाहीत. अश्यावेळी बालकांशी एकट्यात संवाद साधला जातो. काही मुले-मुली आपल्या समस्या कागदावर लिहून देतात.
आकर्षणाची दोन कारणे
तज्ञांच्या मते, भिन्न लिंगी व्यक्तीसंदर्भात १५ ते १७ वर्ष वयोगटात आकर्षण तयार होते. त्याला ते प्रेमाचे नाव देतात. काही मुले-मुलींमध्ये भावनात्मक संबधाची तीव्र इच्छा व्यक्त केली जाते. हे आकर्षण दोन प्रकारचे आहेत. पहिले आकर्षण शारीरिक रूपात असते. त्यात पोषाख, सौंदर्य याचे महत्व असते. तर दुसºयात मानसिक विचार, सवलत, सामाजिक दृष्टिकोणाचे महत्व असते. परंतु आता हे आकर्षण होण्याचे वय कमी होताना दिसत आहे. यामुळे बालगुन्हेगारी वाढत आहे.

Web Title: The feet that got lost were saved by 'friendship'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.