उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:37 PM2018-01-27T22:37:29+5:302018-01-27T22:38:24+5:30

जवळील ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजीत गणतंत्र दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे निमित्त साधून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२६) सत्कार करण्यात आला.

Felicitate the best working people | उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केले सन्मानित : गणतंत्र दिन कार्यक्रमाचे निमित्त

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जवळील ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजीत गणतंत्र दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे निमित्त साधून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२६) सत्कार करण्यात आला.
यामध्ये तनुज मेश्राम व प्रभुदास बन्सोड यांचा, जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार डॉ.अमीत बुध्दे, जिल्हा गुणवंत क्र ीडा मार्गदर्शक दुलिचंद मेश्राम, जिल्हा गुणवंत महिला खेळाडू
पुरस्कार निलम अवस्थी, जिल्हा गुणवंत खेळाडू रु पेश साखरे, जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कार महेश हरिणखेडे यांचा, जिल्हास्तरीय युवा पुरस्कार संस्था वर्गातून पहांदी पारो कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्था खर्रा, जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रमोद गुडधे व पुजा तिवारी यांचा, रशिया-इंडिया युथ फोरममध्ये भारतातर्फेसहभागी होवून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जतीन वहाणे यांचा, आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्र मात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ.धीरज लांबट, निशांत बन्सोड, संजय बिसेन, डॉ.योगेश पटले, अजित सिंग, प्रशांत तिरपुडे यांना, राज्य पोलीस क्र ीडा स्पर्धा २५ मीटर रायफल शुटींग स्पर्धेत रौप्य पदक मिळाल्याबद्दल निलीमा भूजबळ-पाटील यांचा, विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रबोधनात्मक कामगिरी केल्याबद्दल सेवानिवृत्त प्राचार्य श्यामराव बहेकार यांचा, नेहरु युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा मंडल पुरस्कार मेंगाटोला बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांचा, सन २०१७-१८ या वर्षात राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल १७ स्काऊट व १४ गाईड विद्यार्थ्यांचा, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्र माअंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात सर्वात जास्त पुरु ष शस्त्रक्रि या करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.सी.वानखेडे, डॉ.एस.एल.झोडे, डॉ.राधेश्याम पाचे, डॉ.डी.डी.रायपुरे यांचा, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लागवड अधिकारी वाय.के.कुंभलकर यांचा, तायक्वांडो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल उदय रहांगडाले व तुषार हत्तीमारे यांचा, सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सैनिक कल्याण संघटक सुभेदार मेजर जगदिश रंगारी यांचा, सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम पांढरी येथील स्वयंप्रेरणेने नियमीत स्वच्छ ग्राम करणाºया युवक-युवतींचा, माविमच्या उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंदिया व प्रेरणा ग्रामसंस्था भिवापूर यांचा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सन २०१७-१८ या वर्षात उत्कृष्ट काम करणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, सहायक वनसंरक्षक एम.एच.शेंडे, वनसंरक्षक एम.आर.शेख, नायब तहसीलदार पी.एस.बिसेन, सहायक कार्यक्र म अधिकारी आर.पी.शहारे, कार्यक्रम व्यवस्थापक एम.एस.साखरे, निवडणूक कार्यक्र मात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आर.आर.मलेवार यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Felicitate the best working people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.