विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार

By admin | Published: August 19, 2016 01:29 AM2016-08-19T01:29:09+5:302016-08-19T01:29:09+5:30

स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विविध क्षेत्रात

Felicitations of the remarkable workers in different fields | विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार

Next

गोंदिया : स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच सरपंच व सचिवांचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व सचिव यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आमगाव तालुक्यातील गोसाईटोला येथील सरपंच प्रभाबाई शिवबंशी, सचिव डी.के.महाकाळकर, सालेकसा तालुक्यातील रोंधा ग्रामपंचायत सरपंच मिलावतीबाई लिल्हारे, सचिव एन.जी.राठोड, बिंझलीच्या सरपंच सुलोचना लिल्हारे, सचिव जी.सी.भुमके, अर्जुनी/मोर. तालुक्यातील तुकमनारायण, ग्रामपंचायतचे सरपंच दयाराम शहारे, सचिव एस.एस.मेंढे, सोमलपुरचे सरपंच आशा हातझाडे, सचिव वाय.सी.डोंगरे, तिरोडा तालुक्यातील सालेबर्डीचे सरपंच विनोद लिल्हारे, सचिव गणेश कापगते, मनोरा ग्रामपंचायतच्या सरपंच लताबाई पेशने, सचिव एस.डी.उईके यांचा तर क्र ीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्ह्यातील युवकांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हास्तरीय युवा पुरस्कार ब्रम्हानंद सांस्कृतिक अकादमी गोंदिया, कपील बिसेन, सीमा रहांगडाले यांना गौरविण्यात आले.
‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेअंतर्गत आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील हर्षा भेदे, गोरेगाव तालुक्यातील हिरापूर येथील स्वरांगी नेवाने यांना प्रशस्तीपत्र, आरोग्य विभागात सन २०१५-१६ या वर्षात उत्कृष्ट कामिगरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यामध्ये सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.सी.वानखेडे यांनी सर्वाधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीच्या आरोग्य सेविका कुसूम लांजेवार, कुंदा गजभिये, आशा कार्यकर्ती म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावच्या रेखा पटले.
गोंदिया भारत स्काऊट आणि गाईडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्णा बाण चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुरु कृपा आदिवासी आश्रम शाळा ठाणा येथील कब मुले शिवांक उईक, अविनाश मडावी, हिरालाल वरखडे, गुरु नानक वरिष्ठ प्राथमिक शाळा गोंदियाच्या बुलबुल मुली अश्वीनी नंदागवळी, सांची रंगारी, राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार जीईएस हायस्कूल दासगावचे भगीरथ जिवानी, गुरु नानक वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मंजुषा देशपांडे, सामाजिक वनीकरण विभागामार्फत राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत निवड केलेल्या २ कोटी वृक्ष लागवड आण ित्याचे होणारे चांगले परिणाम या विषयावरील निबंध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या प्राथमिक गटातील जानवी वैद्य- प्रथम, करिश्मा कारडा- द्वितीय, हर्षल डोंगरे- तृतीय. माध्यमिक गटातील गीतांजली पोहरे- प्रथम, हेमाश्री तुरकर- द्वितीय, कुशल बिसेन- तृतीय यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
तसेच चोरट्याला पकडून देणाऱ्या महिला पोलीस गुनेश्वरी भांडारकर सोनवाने यांना रोख ५ हजार रुपये बक्षीस देवून पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)

 

Web Title: Felicitations of the remarkable workers in different fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.